Police constable resignation Sarkarnama
देश

Jantar Mantar protest : अभिजीत दीपकेंसमोरच दिला पदाचा राजीनामा; पोलीस हवालदाराबाबत धक्कादायक माहिती आली समोर...

Sher Singh, Uttarakhand Police : पोलीस हवालदाराच्या जंतरमंतरवरील नाट्यमय राजीनाम्यानंतर उत्तराखंड पोलिसांचा खुलासा; निलंबन, गैरहजेरी आणि गँगस्टरशी संबंधांचे गंभीर आरोप उघड.

Rajanand More

Police constable resignation : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दिवसागणिक पाठिंबा वाढत चालला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत एका पोलिस हवालदाराने गुरूवारी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यासमोरच आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे ही घटना देशात चर्चेचा मुद्दा बनली आहे.

उत्तराखंड पोलीस दलातील कॉन्स्टेबल शेर सिंह यांनी जंतरमंतरवर जाऊन दीपके यांच्यासमोर व्यासपीठावरच पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. वर्दीत आलेल्या शेर सिंह यांनी यावेळी खांद्यावरील पोलीस बॅज काढून दीपके यांच्या हातात दिले. त्यानंतर उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली.

आता पोलीस दलाची नोकरी सोडली असून आपल्या अधिकारांसाठी आंदोलनात सहभागी होणार असल्याचा दावा शेर सिंह यांनी यावेळी केला. त्यांनी उपस्थितांना उद्देशून जोरदार भाषणही ठोकले. त्यानंतर दीपके यांनीही आपल्या भाषणात सिंह यांचे कौतुक केले. पण त्यानंतर काही वेळातच शेर सिंह यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उत्तराखंड पोलिसांकडून त्यांच्याविषयी धक्कादायक माहिती देण्यात आली.

'न्यूज १८'च्या वृत्तानुसार, उत्तराखंड पोलिसांनी सांगितले की, शेर सिंह हे पिथोरागढमध्ये सेवेत होते. ते २८ जूनपासून कोणत्याही माहितीशिवाय सेवेत हजर झालेले नाहीत. विभागाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविली होती. पण त्यांच्याकडून काही उत्तर आले नाही. त्यानंतर त्यांना २० जुलै रोजी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

शेर सिंह यांच्यावर गँगस्टरशी कनेक्शनचे गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. मागील काही काळापासून ते अवैध आणि गुन्हेगारीशी संबंधित घटनांमध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहेत. भूमाफिया आणि तसेच काही गुन्हेगारी टोळ्यांशी त्यांचे कनेक्शन असल्याचे आरोप आहेत. आता जंतरमंतरवर वर्दीत जाऊन भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT