Karnataka CM News
Karnataka CM News Sarkarnama
देश

Karnataka Next CM: कर्नाटकात सत्तास्थापनेच्या हलचालींना वेग; नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी? ठरला 'हा' मुहूर्त

सरकारनामा ब्यूरो

Karnataka Election Result: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 224 जागांपैकी 135 जागांवर विजय मिळवला. तर भाजपला फक्त 66 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने आता कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर आता सत्तास्थापनेच्या हलचालींना वेग आला आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसमध्येच रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जात आहे. यातच आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली.

या बैठकीत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदाची निवड ही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निर्णयावर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यावर काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र सिंह आणि माजी सरचिटणीस दीपक बाबरिया यांची निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली. हे निरीक्षक नवनिर्वाचित आमदारांबरोबर चर्चा करून त्यांचे मत जाणून घेणार आहेत. त्यानंतर याबद्दलचा अहवाल काँग्रेस हायकमांडला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर काँग्रेस हायकमांड याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, येत्या दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते. त्यानंतर येत्या गुरुवारी (दि. 18 मे) नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबरोबरच या शपथविधीच्या सोहळ्याला काँग्रेसचे नेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या सोहळ्याला 'समविचारी' पक्षांना देखील निमंत्रण पाठवलं जाण्याची शक्यता आहे.

(Edited By : Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT