Prashant Kishor sarkarnama
देश

Prashant Kishor : '202 आमदार नव्हे, 10 हजारात विकत घेतलं बहुमत!', प्रशांत किशोर यांचा थेट हल्लाबोल

Bihar politics controversy 2026 : प्रशांत किशोर यांनी सम्राट चौधरींवर थेट आरोप करत 202 आमदार नव्हे तर 10 हजार रुपयांत बहुमत विकत घेतल्याचा दावा केला. बिहारच्या राजकारणात खळबळ.

Rashmi Mane

बिहारमध्ये नव्या सत्तास्थापनेनंतर राजकीय वातावरण पुन्हा चांगलंच तापलं आहे. जन सुराजचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी नव्याने मुख्यमंत्री झालेल्या सम्राट चौधरी यांच्यावर गंभीर आरोप करत मोठा हल्लाबोल केला आहे. त्यांच्या मते, हे 202 आमदारांचं स्वाभाविक बहुमत नसून ते केवळ 10 हजार रुपयांत खरेदी केलेलं आहे. त्यांनी असा दावा केला की, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक नव्हती आणि निवडणूक आयोग तसेच सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून हे बहुमत मिळवण्यात आलं.

प्रशांत किशोर यांनी पुढे सांगितलं की, ही संपूर्ण घडामोड ‘बॅकडोर’ पद्धतीने पार पडली. काही प्रभावशाली लोकांनी आपली सत्ता वापरून नीतीश कुमार यांना बाजूला केलं आणि आपल्या पसंतीच्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी बसवलं. त्यामुळे या सत्तांतरावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

सम्राट चौधरी यांच्या वैयक्तिक प्रतिमेवरही त्यांनी टीका केली. त्यांच्या चाल, चारित्र्य आणि राजकीय भूमिकांबद्दल शंका उपस्थित करत किशोर म्हणाले की, त्यांना कोणत्याही न्यायालयाने पूर्णपणे निर्दोष घोषित केलेलं नाही. काही प्रकरणांत त्यांना केवळ अल्पवयीन असल्यामुळे दिलासा मिळाला होता. तसेच, ते स्वतःच्या कर्तृत्वावर मुख्यमंत्री झाले नसून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या पाठिंब्यामुळे त्यांना ही संधी मिळाली, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बिहार विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सम्राट चौधरी सरकारने विश्वासदर्शक ठराव सहज मंजूर करून घेतला. सुमारे 100 मिनिटांच्या चर्चेनंतर हा ठराव ध्वनिमताने मंजूर झाला. प्रत्यक्ष मतदानाची वेळ आली नाही आणि विरोधकांनी मतविभाजनाची मागणीही केली नाही. सभापती डॉक्टर प्रेम कुमार यांनी ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT