Prashant Kishor Sarkarnama
देश

Prashant Kishor : यावेळी लिहून देतो बिहारमध्ये कोणाची सत्ता, प्रशांत किशोरांनी दिले चॅलेंज

Prashant Kishor on Bihar Politics : पक्ष स्थापनेची घोषणा करताच प्रशांत किशोर यांनी NDA आणि I.N.D.I.A युतीला मोठे आव्हान दिले आहे. यावेळी मी लिहून देतो की बिहारमधील जनता 2025 च्या विधानसभा निवडणुकीत NDA आणि I.N.D.I.A चा पूर्णपणे सफाया करेल.

Sudesh Mitkar

Mumbai News : बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीची चाहूल ऐकू येऊ लागली आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्या नेत्याची सर्वाधिक चर्चा होत आहे ते म्हणजे जनसुराज्यचे संयोजक प्रशांत किशोर. प्रशांत किशोर यांनी 2 ऑक्टोबर रोजी नव्या पक्ष स्थापनेची घोषणा केली आहे.

पक्ष स्थापनेची घोषणा करताच प्रशांत किशोर यांनी NDA आणि I.N.D.I.A युतीला मोठे आव्हान दिले आहे. प्रशांत किशोर म्हणाले की, आम्ही 2 ऑक्टोबरला पक्ष स्थापन करणार आहोत. यावेळी मी लिहून देतो की बिहारमधील जनता 2025 च्या विधानसभा निवडणुकीत NDA आणि I.N.D.I.A चा पूर्णपणे सफाया करेल. आणि यावेळी जनता जनसुराज्य पक्षाला विजयी करेल.

बिहारची जनताच बिहार बदलेल  


जर बिहार बदलायचा असेल तर ते बिहारच्या जनतेवर अवलंबून आहे, मग ते आज असो किंवा 20 वर्षांनी. तामिळनाडू आणि पंजाबमधून तुमच्यासाठी कोणी येणार नाही. प्रशांत किशोर म्हणाले की, बिहारमधील श्रीमंत लोक आपण पैशाच्या जोरावर आपल्या मुलाला शिक्षण देऊ असा विचार करत आहेत. मात्र  त्यांचा मुलगा बाहेर शिकायला गेला आणि त्याच ठिकाणी त्याला नोकरी लागला तर तो बिहारला क्वचितच परत येईल, असा विचार ते करत नाहीत.

प्रशांत किशोर पुढे म्हणाले की, काही लोक आम्हाला विचारत आहेत की तुम्ही कोणाची मते कापणार, एनडीएची कि इंडिया आघाडीची पण आम्ही त्यांना यावेळी लिहून देतो की NDA आणि I.N.D.I.A चे पत्ते पूर्णपणे साफ होतील. यावेळी जनसुराज पूर्णपणे बिहारच्या जनतेसोबत असून जनता आमच्यासोबत आहे असा विश्वास प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT