Prashant Kishor on AAP Defeat in Delhi Sarkarnama
देश

Prashant Kishor on Arvind Kejriwal : 'AAP'च्या पराभवानंतर 'PK' यांनी केजरीवालांची मोठी चूकही सांगितली अन् सल्लाही दिला!

Prashant Kishor on AAP Defeat in Delhi : जाणून घ्या, राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यादृष्टीने केजरीवालांनी कोणती मोठी चूक केली जी 'आप'ला महागात पडली.

Mayur Ratnaparkhe

Prashant Kishor on Delhi Vidhan Sabha Election Result : प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार आणि बिहारमधील जनसुराज पार्टीचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या दारूण पराभवावर प्रतिक्रिय दिली दिली आहे. त्यांनी म्हटले की अरविंद केजरीवाल यांनी मद्य धोरण प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे ही एक धोरणात्मक मोठी चूक होती. ज्यामुळे त्यांचा पक्षाला मोठे नुकसान सहन करावे लागले.

एका वृत्तवाहिनीस बोलताना प्रशांत किशोर(Prashant Kishor) यांनी म्हटले की, मागील काही वर्षांत केजरीवाल यांची बदलती राजकीय रणनीती, जसे की आधी इंडि आघाडीत सहभागी होणे आणि नंतर दिल्ली निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेणे, हे देखील आम आदमी पार्टीच्या खराब प्रदर्शनामागील प्रमुख कारणांपैकी एक आहेत.

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी म्हटले की, आम आदमी पार्टीच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण दहा वर्षांची अँटी-इनकंम्बसी होते. दुसरी आणि कदाचित सर्वात मोठी चूक होती, ती म्हणजे केजरीवालांचा राजीनामा. खरंतर केजरीवालांनी(Arvind Kejriwal) तेव्हाच राजीनामा दिला पाहिजे होता, जेव्हा त्यांना मद्य धोरण प्रकरणात अटक केली होती. परंतु जामीन मिळाल्यानंतर निवडणुकीच्या आधी कुणा एखाद्याला मुख्यमंत्री बनवणे त्यांच्यासाठी एक मोठी धोरणात्मक चूक ठरली.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अडीच दशकानंतर भाजप सत्तेत परतली आहे. 70 विधानसभा जागांपैकी 48 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. आम आदमी पार्टीचे दहा वर्षांचे सरकार कोसळले आहे. या निवडणुकीत आम आदमी पार्टीला(AAP) अवघ्या 22 जागा जिंकण्यातच यश मिळालं. तर काँग्रेस सलग तिसऱ्यांदा आपलं खातं उघडण्यात अयशस्वी ठरली आहे.

प्रशांत किशोर म्हणाले की, केजरीवालांच्या सातत्याने बदलत्या राजकीय रणनीतीने त्यांची विश्वासर्हता कमकवुत केली. आधी इंडि आघाडीत सहभागी होणं आणि मग त्यातून बाहेर पडणं, त्यांच्या प्रतिमेला नुकसान पोहचवणारे ठरले. याशिवाय माागील काही वर्षांत त्यांचे प्रशासकीय मॉडेल कमजोर पडले.

दिल्लीत मागील मान्सूनमध्ये खालच्या भागात राहणाऱ्या लोकांना ज्या अडचणींना सामोरे जावे लागले, त्यामुळे आम आमदी पार्टी सरकारचे प्रशासकीय अपयश समोर आले. झोपडीत राहणाऱ्या लोकांच्या समस्यांनी केजरीवाल सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि हेच त्यांच्यासाठी नुकसानदायक ठरले.

याशिवाय प्रशांत किशोर यांनी म्हटले की, हा पराभव केजरीवालांसाठी नवीन संधी म्हणून पाहता येईल. दिल्लीत आम आमदी पार्टीला राजकीय पुनरागमन करणं अवघड असणार आहे. परंतु आता केजरीवालांकडे सरकार चालवण्याची जबाबदारी नाही. ते या वेळेचा उपयोग गुजरात सारख्या राज्यात आम आदमी पार्टीचा विस्तार करण्यासाठी करू शकतात. जिथे त्यांच्या पक्षाने मागील निवडणुकीत चांगली कामगिरी केली होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT