kolkata voter list
kolkata voter list sarkarnama
देश

प्रशांत किशोर बनले ममतादीदींचे मतदार ; भाजपने केला फोटो शेअर

सरकारनामा ब्युरो

मुंबई : निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर (prashant kishor) यांची ओळख असली तरी सध्याच्या त्यांच्या प्रवासावरुन त्यांच्या राजकीय भूमिकाही दिसत आहेत. प्रशांत किशोर यांनी २०१८ मध्ये जदयुमध्ये प्रवेश करुन आपली राजकीय महत्वाकांक्षा उघडपणे दाखविली होती. काही दिवसापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने सोशल मीडियावरुन टीका करत आहेत. त्यामुळे त्यांची राजकीय महत्वाकांक्षेवर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. कॉग्रेसमध्ये ते प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची रणनीती ठरविण्याचे काम त्यांनी केले होते. त्यात त्यांना अभूतपूर्व यश आले. परंतु खुद्द ममता बॅनर्जी मात्र नंदिग्राम मधील निवडणूक हरल्या. त्यामुळे भवानीपूरच्या पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. येत्या ३० तारखेला ही निवडणूक होत आहेत. प्रशांत किशोर हे '159 भवानीपुर विधानसभा'चे मतदार बनले आहेत.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या महत्वाच्या भवानीपूर पोट निवडणुकीपूर्वी प्रशांत किशोर यांनी आपले नाव कोलकत्याच्या मतदार (kolkata voter list) यादीत नोंदवून घेतले आहे. ते प्रशांत किशोर असे जरी नाव नुसते लावत असले तरी त्यांचे आडनाव पांडे आहे, असे त्यांच्या नोंदणी करून दिसते. यासाठी त्यांनी आपला “केअर ऑफ” पत्ता खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या निवासस्थानाचा दिला आहे.

अशा स्थितीत भाजपने आपल्या विरोधात कोणतीही तक्रार दाखल करू नये तसेच ममता बॅनर्जी यांना मदत व्हावी, या हेतूने प्रशांत किशोर यांनी आपले नाव पश्चिम बंगालमधल्या मतदार यादीत नोंदवून घेतले आहे. प्रशांत किशोर हे मूळचे बिहारमधल्या सासाराम जिल्ह्याचे रहिवासी आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT