Prashant Kishor News  Sarkarnama
देश

Prashant Kishor News : प्रशांत किशोर आंध्र प्रदेशच्या राजकारणात परतले, चंद्राबाबूंशी 3 तास चर्चा...

Prashant Kishor News : चंद्राबाबूंचे विरोधक जगन मोहन रेड्डी यांच्यासाठीही प्रशांत किशोर यांनी रणनीतीचे काम केले आहे.

Chetan Zadpe

Andhra Pradesh News : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर अचनाक आंध्र प्रदेशमध्ये परतले आहेत. मात्र, यावेळी ते टीडीपीसोबतच राहणार असल्याचे आंध्र प्रदेशात आता सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे. किशोर यांनी यापूर्वी आंध्र प्रदेशात त्यांनी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यासोबत काम केले होते. आता ते त्यांचे रेड्डी यांचे प्रतिस्पर्धी चंद्राबाबू यांच्यासाठी रणनीतीच्या दृष्टीकोनातून काम करण्याचे संकेत दिले आहेत. टीडीपीचे राष्ट्रीय सरचिटणीस नारा लोकेशसोबत प्रशांत किशोर चार्टर्ड फ्लाइटने विजयवाडा विमानतळावर पोहोचले. येथून ते टीडीपीचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या निवासस्थानी गेले. (Latets Marathi News)

माहितीनुसार, प्रशांत किशोर आणि नायडू यांच्यात सुमारे 3 तास चर्चा झाली. या दोघांमध्ये आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशांत हे टीडीपीचे मुख्य निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याशिवाय शो टाईम कन्सल्टन्सीचे संचालक संथनु सिंग आणि रॉबिन शर्मा देखील उपस्थित राहणार आहेत. हे दोघेही आधीच टीडीपीसाठी काम करत आहेत. अशा स्थितीत प्रशांत जे काही रणनीती आखतील त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. प्रशांत यांच्यासोबत टीडीपी हायकमांडची आणखी एक बैठक होणार असून, त्यानंतर हा करार निश्चित होईल.

वायएसआरसीपीला चांगले निकाल -

प्राप्त माहितीनुसार, प्रशांत किशोर यांच्या I-PAC मधील काही लोक सध्या YSRCP साठी काम करत आहेत. प्रशांत आणि नायडू यांना एकत्र काम करण्यास अंतिम मंजुरी मिळाल्यास ते टीडीपीमध्ये जातील. प्रशांत किशोर यांनी 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वायएसआरसीपीसाठी काम केले आहे. 2019 मध्ये टीडीपीचा पराभव करून राज्यात वायएसआरसीपीला सत्तेवर आणण्यातही त्यांनी मोठी भूमिका बजावली. त्यांनी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या निवडणूक प्रचाराची तयारी केली.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT