Prashant Kishor Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024: प्रशांत किशोर यांचा मोठा दावा; म्हणाले, भाजपला मिळणार इतक्या जागा...

Sachin Waghmare

Political News : लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा तोंडावर आला आहे. त्यामुळे सर्वत्र प्रचार जोरात सुरु आहे. जवळपास 360 मतदारसंघातील उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. तर दुसरकीकडे उर्वरित तीन टप्प्यात मतदान होणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

सत्ताधारी व विरोधकांकडून जोरदार प्रचार केला जात असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केला जात असल्याने देशभरातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणूक 2024 बाबत अनेक भाकीते केली आहेत. त्यामुळे त्यावर राजकीय विश्लेषकात चर्चा रंगली आहे.

आगामी काळात पश्चिम बंगाल, ओरिसा, तेलंगणा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये भाजपला (Bjp) फायदा होईल, असे वातावरण या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) दिसत आहे. या पाच राज्यांमध्ये भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला 400 जागांचा टप्पा गाठता येणार नाही, हे खरे असले तरी या निवडणुकीत भाजपला जवळपास 300 जागा मिळू शकतात, असा दावा राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर (Prashant KIshor) यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसापासून भाजपच्या कामगिरीबद्दल अनेक टीका व टिप्पण्या, वादविवाद सुरू आहेत. उत्तर आणि पश्चिमेतील भाजपच्या जागांमध्ये कोणतीही घट झाल्याचे मला दिसत नाही. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत देशभरातील विरोधक मजबूत झाला आहे. मात्र, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए हाच विजयाचा दावेदार असल्याचे जनसुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पश्चिम बंगाल, ओरिसा, तेलंगणा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये भाजपला पूर्वीपेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज आहे. त्यामुळे भाजपला 400 जागांचा टप्पा गाठता येणार नाही, पण 200 जागेपर्यंत भाजपची घसरण होणार नसल्याचा पुनरुच्चारही यावेळी बोलताना प्रशांत किशोर यांनी केला.

जनसुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी केलेल्या या दाव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तरी त्यांनी भाजपला मित्रपक्षांच्या मदतीने ३०० पर्यंत जागा व बहुमत मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे सर्वांचे आता 4 जूनला होणाऱ्या मतमोजणीकडे लक्ष लागले आहे.

SCROLL FOR NEXT