PM Narendra Modi 
देश

यंदाच्या दिवाळीत 'हे' कराच! पंतप्रधान मोदींचे कळकळीचे आवाहन

पंतप्रधान मोदी यांनी आज देशवासियांशी संवाद साधला...

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशावासियांना यंदाच्या दिवाळीसाठी आवाहन केलं आहे. त्यांनी मेड इन इंडियाचा नारा देत यंदाच्या दिवाळीत भारतात तयार झालेल्या वस्तूंचीच खरेदी करण्याचे आवाहन केलं आहे. मागील दिवाळीत प्रत्येकाच्या मनात तणाव होता. पण या दिवाळीत 100 कोटी डोसच्या लसीकरणाने विश्वास निर्माण झाला आहे, असं पंतप्रधानांनी नमूद केलं.

पंतप्रधान मोदी म्हणाले, सध्या सर्व क्षेत्रात सकारात्मकता वाढली आहे. येणाऱ्या उत्सवांमध्ये त्याला अधिक गती मिळेल. कधीकाळी 'मेड इन...' च्या पुढे अनेक देशांची नावे होती. पण आज प्रत्येक देशावासियांना मेड इन इंडियाची ताकद वाढल्याचे दिसले आहे. त्यासाठी प्रत्येक भारतीयांनी घाम गाळला आहे. आता भारतात बनलेली वस्तू खरेदी करणे, व्होकल फॉल लोकल हे आपल्याला व्यवहारात आणयलाच हवे. प्रत्येकाच्या प्रयत्नाने हे आपण घडवू.

देशाची लस मला सुरक्षा देत असेल तर देशात तयार झालेल्या वस्तू ही दिवाळी अधिक भव्य बनवेल. दिवाळीतील विक्री व इतर वर्षभरातील विक्रीत मोठा फरक असतो. 100 कोटींचे लसीकरण छोटे-छोटे दुकानदार, व्यावसायिकांसाठी आशेचा किरण बनून आली आहे. ही सफलता नवा आत्मविश्वास देतो, असं म्हणत पंतप्रधानांनी यावर्षीच्या दिवाळीत भारतात तयार झालेल्या वस्तूंचीच खरेदी करण्याचे आवाहन केलं.

शस्त्र खाली ठेवू नका!

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासियांशी संवाद साधताना कोरोनाविषयी (Covid-19) सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. शंभर कोटी डोस (Vaccination) दिले गेले असले तरी युध्द अजून संपलेले नाही. कवच कितीही मजबूत, सुरक्षेची हमी देणारा असला तरी शस्त्र खाली ठेवून चालणार नाही, असं म्हणत मोदींनी देशवासियांना मास्कचा वापर व लस घेण्याचे आवाहन केले.

आज आपण म्हणू शकतो की, मोठे लक्ष्य निश्चित करणं आणि ते साध्य करणे जाणतो. पण त्यासाठी सतत सावधान राहायला हवे. आपल्याला निष्काळजीपणा करून चालणार नाही. कवच कितीही मजबूत आधुनिक असले, तरी युध्द जोपर्यंत सुरू आहे, तोपर्यंत शस्त्र टाकून चालणार नाही. त्यामुळे सण पूर्ण सतर्कता ठेवूनच साजरे करावे लागणार आहेत, असं आवाहन मोदींनी केलं.

जसे चप्पल घालूनच बाहेर जातो, तसेच आता मास्कही सहज स्वभाव बनवावा लागेल. ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी याला प्राधान्य द्यायला हवे. ज्यांनी लस घेतली आहे त्यांनी इतरांना प्रोत्साहन द्यावे. पूर्ण विश्वास आहे की सर्व मिळून प्रयत्न केले तर कोरोनाला लवकरात लवकर हरवू, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT