देश

Narendra Modi Speech in New Parliament : नवीन संसदेतील पहिल्याच भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, '' हे भवन आत्मनिर्भर...''

New Parliament Building Inauguration : ''नवीन संसद भवन भारतोसोबतच जगाच्या विकासाचंही नेतृत्व करेल...''

सरकारनामा ब्यूरो

New Parliament Building News : देशाला लोकशाहीचं नवं मंदिर मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाच्या नव्या संसद भवनाचं आज(दि.२८) पारंपरिक पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला देखील उपस्थित होते. यावेळी मोदी आणि बिर्ला यांनी पारंपरिक पद्धतीने कलश पूजन करून सेंगोलची पूजा केली. पूजनानंतर पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष बिर्लांनी सेंगोलची स्थापना लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीशेजारी स्थापना केली. यानंतर मोदींनी नवीन संसद भवनाविषयी गौरवोद्गार काढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी नवीन संसद भवनाच्या लोकार्पण सोहळ्याच्या दुसर्या टप्प्यात पहिलं भाषण केलं. यावेळी त्यांनी लोकशाही, संसद भवन यांसह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मोदी म्हणाले, काही क्षण असे येतात की, ते काळाच्या पटलावर चिरंतन होऊन जातात. असाच आजचा दिवस आहे.

नवीन संसद भवना(New Parliament Building Inauguration ) चा लोकार्पणाचा दिवस शुभ दिवस आहे. हे संसद भवन नाही तर १४० कोटी जनतच्या आशा, आकांक्षाचं प्रतिबिंब आहेत. हे नवीन संसद भवन आत्मनिर्भर भारताच्या सूर्योदयाचं साक्षीदार असणार आहे. तसेच ते भारतासोबतच जगाच्या विकासाचंही नेतृत्व करेल. जग आपल्या देशाकडे आदर व उमेदीनं बघत आहे.

संसदेत पवित्र सेंगोलची स्थापना करण्यात आली आहे. मागील काही काळापासून सेंगोल हा सत्ता हस्तांतरणाचा प्रतीक बनला होता. पण त्याची संसदेत स्थापना करुन त्याचा मान आपण पुन्हा मिळवून दिला आहे. सविधान हा आपला संकल्प आहे. भारतातूनच जगाच्या प्रगतीचा मार्ग सुरु होईल. आज नवा भारत नवं लक्ष्य ठरवत आहे. जेव्हा भारताचा विकास होतो तेव्हाच जग पुढे जातं.लोकशाही फक्त व्यवस्था नाही तर संस्कार, विचार, परंपरा आहे. जागतिक पातळीवर भारत(India) हा लोकशाहीचा सर्वात मोठा आधार आहे.

सेंगोल हा सत्ता हस्तांतरणाचा प्रतीक बनला होता. पण त्याची संसदेत स्थापना करुन त्याचा मान आपण पुन्हा मिळवून दिला आहे. सविधान हा आपला संकल्प आहे असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. देशाच्या विकासातील आजचा दिवस ऐतिहासिक क्षण आहे असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

देशाचं भविष्य उज्जल करणारी वास्तू नवी हवी. भारत गुलामीच्या विचारातून आता बाहेर आला आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्ष नव्या विचारांचं प्रतीक आहे. संसदेची नवी इमारत अपुरी पडत होती. तसेच आगामी काळात लोकसभेच्या सदस्यांची संख्या वाढू शकते. या नवीन इमारतीत भारताची छबी दिसते. विजेचा कमीत कमी वापर हे या वास्तूचं वैशिष्ट्यं आहे. संसदेची नवीन वास्तू अत्याधुनिक आहे. भाजप सरकार(BJP Government)ची नऊ वर्ष नवनिर्माणाची आहे. नवीन संसद भवनात संस्कृती, संविधानाचं सूर आहेत असल्याचंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT