मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना आज भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या स्मृतीमध्ये पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' प्रदान करण्यात आला. मुंबईतील (Mumbai) षण्मुखानंद हॉल येथे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान मोदी हे स्वत: उपस्थित राहिले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी लता मंगेशकर, ह्रदयनाथ मंगेशकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. (Prime Minister Narendra Modi receives the first Lata Deenanath Mangeshkar Award in Mumbai)
पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत यावेळी राज्यापाल भगतसिंह कोश्यारी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असे सर्व नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या सोहळ्याला अनुपस्थित होते. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, मी विमानातून येताना लता दिदींशी माझे नाते किती जुने आहे याचा विचार करत होतो. तेव्हा मला आठवलं हे ४ ते साडे चार दशकांपासूनचे जुने नाते होते. सुधीर फडकेंमुळे आमची भेट झाली होती. तेव्हा पासूनच्या अनेक घटना, आठवणी या माझ्या स्मरणात आहेत.
लता दिदी या माझ्या मोठ्या बहिणीसारख्या होत्या. लहान भावासारखे त्यांनी अपार माझ्यावर प्रेम केले. लता मंगेशकर यांनी सांगितलेल्या लोकांनी आपल्याला नावाने नाही तर कामाने ओळखायला हवे या वाक्यानुसार मी काम करण्याचा प्रयत्न करतो. सन्मान स्विकारणे हे माझ्या तत्वात बसतं नाही, पण हा पुरस्कार लता दिदींच्या नावे असल्याने मी तो स्विकारण्याचा निर्णय घेतला. हा पुरस्कार म्हणजे त्याच्या प्रेमाचे प्रतिक आहे. मी या कार्यक्रमाला येण्यासाठी माझे नियोजनही बघितले नाही, आधी हो म्हणालो असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. यावेळी मोदी यांनी मी हा पुरस्कार देशाच्या लोकांना अर्पण करत असल्याचे सांगितले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, लता मंगेशकर या वयानं आणि कर्तुत्वानंही मोठ्या होत्या. त्यांच्या आवाजानं ८० वर्षे संगीत क्षेत्रावर आपली छाप सोडली. संगीत क्षेत्रात ग्रामोफोनपासून कॅसेट, सीडी, डीव्हीडी, पेनड्राईव्ह हा सर्व काळ त्यांनी पाहिला. संगीत साधना आणि ईश्वराची साधना त्यांच्यासाठी एकच होती. ब्रिटिश व्हाईसरॉयच्या कार्यक्रमात वीर सावकर यांचे गीत दिनानाथ मंगेशकर यांनी गायले. हे केवळ दिनानाथ मंगेशकरच करु शकतात. सावरकरांनी हे गीत इंग्रजांना आव्हान म्हणून लिहिलं होतं. हा वारसा दिनानाथ मंगेशकर यांनी आपल्या पुढच्या पिढीला दिला, असेही ते म्हणाले.
शिवकल्याण राजा, ऐ मेरे वतन के लोगो सारखी ओळींनी आणि त्यांच्या आवाजाने लोकांच्या मनावर गारूड केले. लता दीदींच्या गाणांचा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवात समवाेश व्हायला हवा, अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखविली. पूर्व-पश्चिम ते उत्तर-दक्षिणेत लता दादींच्या सुरांनी लोकांना समृद्ध केले असेही ते म्हणाले. पुण्यात लता दिदींनी मास्टर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या माध्यमातून गरिबांसाठी मोठं काम केले. कोरोना काळात लोकांच्या सेवेत पुण्यातील या रुग्णालयाचा मोठा वाटा होता, असे म्हणतं त्यांनी मंगेशकर रुग्णालयाच्या कामगिरीचा गौरव केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.