Narendra Modi Sarkarnama
देश

Narendra Modi News : तुम्हारे पाँव के नीचे कोई ज़मीन नहीं..; मोदींची शेरोशायरीतून राहुल गांधींवर टीका

Rahul Gandhi : आज ते वेळेवर उठलेही नसतील, असा टोला मोदींनी राहुल गांधींना लगावला.

सरकारनामा ब्यूरो

Politics : ''मी काल पाहिलं. काही लोकांच्या भाषणानंतर काही लोक आनंदाने उड्या मारत होते. त्यामुळे त्यांनाही चांगली झोप लागली असावी. पण आज ते वेळेवर उठलेही नसतील'', असा टोला राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला. तसेच यावेळी त्यांनी शेरोशायरीतून विरोधकांवर टीका केली. ते आज सभागृहात बोलत होते.

मोदी म्हणाले, ''अनेक लोकांनी आपले आकडे दिले. काहींनी तर तर्कही मांडला. पण या भाषणांवरुन कुणाची क्षमता किती आहे हे लक्षात येते. काही लोकांच्या भाषणानंतर इकोसिस्टिम समर्थक उड्या मारत होते. कदाचीत त्यांना चांगली झोप लागली असेल. पण ते आज उठले नसतील. त्यामुळे या लोकांसाठी असं बोललं जातं की, ‘ये केह केहकर हम, दिल को बेहला रहे है, वो अब चल चुके है, वो अब आ रहे है” अशी शेरोशायरी म्हणत मोदींनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

मोदी म्हणाले, ''येथे प्रत्येकाने आपापले आकडे दिले. तसेच वेगवेगळे मुद्दे देखील मांडले. पण हे सर्व समजून घेताना कोणाची क्षमता किती आहे, योग्यता आणि हेतू काय आहे? हे सर्व लक्षात येतं. देश या सगळ्याचे मूल्यमापन करत असतो. काहींना तर हार्वर्ड अभ्यासाची क्रेझ आहे. पण हार्वर्डमध्ये एक अभ्यास करण्यात आला. काँग्रेसचा उदय आणि पतन हा अभ्यासाचा विषय आहे'', असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

तसेच ''तुम्हारे पाँव के नीचे कोई ज़मीन नहीं, कमाल ये है की फिर भी तुम्हें यक़ीन नहीं'', या एका गझलमधील दोन वळी त्यांनी यावेळी सांगितल्या.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात देशातील विविध मुद्यांवर भाष्य केलं. तसेच विरोधी पक्षाला देखील घेरण्याचा प्रयत्न केला. त्याच बरोबर २०१४ च्या आधी देशात काय परिस्थिती आणि २०१४ ला केंद्रात भाजपचे (bjp) सरकार आल्यानंतर काय फरक पडला याबाबत त्यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT