B. S. Yediyurappa-Narendra Modi
B. S. Yediyurappa-Narendra Modi Sarkarnama
देश

पंतप्रधान मोदींनी येडियुरप्पांची ती मागणी केली मान्य!

सरकारनामा ब्यूरो

बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आमच्या विनंतीनुसार महिन्यातून किमान एकदा कर्नाटकला (Karnataka) भेट देण्याचे मान्य केले आहे अशी माहिती, माजी मुख्यमंत्री व भाजप संसदीय समितीचे सदस्य बी. एस. येडियुरप्पा (B. S. Yediyurappa) यांनी दिली. नवी दिल्लीहून परतल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते. (Prime Minister Narendra Modi will visit Karnataka once a month : B. S. Yediyurappa)

येडियुरप्पा यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन राज्यातील पक्षसंघटनेवर सविस्त चर्चा केली. ते म्हणाले की, महिन्यातून किमान एकदा तरी राज्याच्या विविध भागांना वारंवार भेटी देण्याची विनंती मी पंतप्रधान मोदी यांना केली आणि त्यांनी ती मान्य केली आहे. मी नड्डा यांच्याशीही या संदर्भात बोललो. आम्ही पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, याचाही येडियुरप्पा यांनी पुनरुच्चार केला.

मोदी आणि नड्डा यांनी कर्नाटकातील राजकीय परिस्थितीबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मी पंतप्रधानांना वारंवार राज्याला भेट देण्याची विनंती केली आणि त्यांना आश्वासन दिले की भाजप 140 पेक्षा जास्त जागा जिंकेल आणि सत्तेत परत येईल, असे येडियुरप्पा म्हणाले. कोणतीही शक्ती भाजपला सत्तेत परत येण्यापासून रोखू शकत नाही, असा दावाही येडियुरप्पा यांनी या वेळी बोलताना केला. पक्ष मजबूत करण्यासाठी पक्षाचे नेते लवकरच राज्यभर दौरे सुरू करतील. आम्हाला विश्वास आहे की, जनता आम्हाला पुन्हा आशीर्वाद देईल. सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या काँग्रेसला आम्ही कोणतीही संधी देणार नाही. आम्ही भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी एकत्र काम करू, असे ते म्हणाले.

कर्नाटक स्टेट कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने लावलेला ४० टक्के कमिशनचा आरोपही चार वेळा मुख्यमंत्र्यांनी धुडकावून लावला. कोणाच्या प्रभावाखाली काही मूर्खांनी केलेले खोटे आरोप खरे होऊ शकत नाहीत, असे ते म्हणाले. तसेच कंत्राटदारांच्या संस्थेला लोकायुक्तांकडे जाण्यास सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT