Priyanka Chaturvedi’s viral video draws attention as Shashi Tharoor adds a witty comment, creating a social media storm. Sarkarnama
देश

Shashi Tharoor News : तुम्ही तर साडीतील शशी थरूर..! प्रियांका चतुर्वेदींचा Video व्हायरल होताच थरूर यांचीही खास कमेंट...

Priyanka Chaturvedi’s Viral Video Sparks Buzz : पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या फोटोनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्याबाबत बोलताना प्रियांका यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Rajanand More

Shashi Tharoor’s Special Comment on the Video : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी सध्या चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यावरून बरेच तर्कवितर्क लढविले जात होते. आता पुन्हा एकदा त्यांच्या एका व्हिडीओमुळे त्यांनी लक्ष वेधून घेतले आहे.

‘एएनआय’ वृतसंस्थेच्या स्मिता प्रकाश यांच्यासोबतच्या पॉडकास्टचा हा व्हिडीओ आहे. यादरम्यान स्मिता प्रकाश यांनी काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचा अशाप्रकारे उल्लेख केला की त्यावर थरूर यांनीही आभार मानायला विसरले नाहीत. चतुर्वेदी यांच्या मोदींशी भेटीवरून चर्चा सुरू असताना त्यावर प्रियांका म्हणाल्या, मला अनेकदा लोकांना चिडवायला आवडते, कारण ते माझ्याबाबतीत एवढे विचार करतात की, आता या कुठे जाणार, आता या कुठे जाणार?

प्रियांका चतुर्वेदी यांच्या या विधानावर स्मिता प्रकाश यांनी गंमतीत म्हटले की, ‘तुम्ही खरंतर साडीतील शशी थरूर आहात.’ त्यावर प्रियांका यांनीही हसतच उत्तर दिले. त्या म्हणाल्या, ‘हे माझे कौतुक आहे की शशी थरूर यांचे, हे मला माहिती नाही. पण मी हे शशी थरूर यांना सांगेन.’ या संभाषणाचा समावेश असलेली व्हिडीओ क्लिप प्रियांका यांनी सोशल मीडियात शेअर केली आहे.

प्रियांका यांनी सोशल मीडियात व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे की, ‘आणि मी एएनआयच्या स्मिता प्रकाश यांच्यासोबत पॉडकास्टमधून परत आली आहे. एक चर्चा जी ताजी आणि मजेदार होती.’ सोशल मीडियात सक्रीय असलेल्या शरूर यांच्यापर्यंतही हा व्हिडीओ पोहचला आणि त्यांनी काही तासांत त्यावर प्रतिक्रियाही दिली. प्रियांका चतुर्वेदी यांची पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले की, ‘आभारी आहे प्रियांका… मी स्वतःला कोणत्याही प्रकारे खुश समजतो!’  

दरम्यान, पंतप्रधान मोदींसोबतच्या फोटोनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्याबाबत बोलताना प्रियांका यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यावर त्यांनी ‘आम्ही म्हणालो होतो, त्या संसदीय प्रतिनिधी शिष्टमंडळात होत्या आणि व्हायचे तेच झाले’, या सोशल मीडियातील प्रतिक्रियांची पुनर्रुच्चार करत खिल्ली उडवली. प्रियांका चतुर्वेदी यांची राज्यसभेची मुदत पुढील वर्षी संपत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT