Rahul Gandhi, Priyanka Gandhi Sarkarnama
देश

Priyanka Gandhi : ''अदानी,अंबानींनी सर्वांना विकत घेतलं, पण राहुल गांधींना ते विकत घेऊ शकले नाही;कारण..!''

Priyanka Gandhi On Modi Government : "राहुल गांधी यांनी सत्याची ढाल धारण केल्यामुळेच..''

सरकारनामा ब्यूरो

Priyanka Gandhi And Rahul Gandhi News : "राहुल गांधी यांनी सत्याची ढाल धारण केल्यामुळेच त्यांना थंडी वाजत नाही, अदानी, अंबानी यांनी सर्वांना विकत घेतले आहे, पण माझ्या भावाला कधीही विकत घेऊ शकत नाही कारण तो सत्याच्या बाजूने उभा आहे...'' असे कौतुकोद्गार काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वड्रा (Priyanka Gandhi) यांनी काढले आहेत.

काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नऊ दिवसांच्या विश्रांतीनंतर उत्तर प्रदेशात दाखल झाली आहे. या यात्रेचं गाझियाबाद प्रियांका गांधी वड्रा यांनी स्वागत केलं. यावेळी प्रियांका यांनी राहुल गांधींवर कौतुकाचा वर्षाव करतानाच मोदी सरकारवर टीका केली. यावेळी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी देखील भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. या प्रसंगी राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यातील बहीण भावाचं प्रेम देखील पाहायला मिळालं आहे.

प्रियंका गांधी म्हणाल्या, राहुल गांधीची प्रतिमा मलीन करण्यासाठी केंद्र सरकारनं सर्व शक्ती पणाला लावली आणि कोट्यवधी रूपये खर्च केले.मात्र, घाबरले नाहीत कारण ते एक योद्धा आहेत. तसेच राहुल हे सरकारपुढे झुकले देखील नाहीत. आणि महत्वाचं म्हणजे ते सत्याच्या मार्गापासून दूर गेले नाहीत.

असा असेल काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा पुढचा प्रवास

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो’ यात्रा ९ दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी उत्तर प्रदेशात दाखल झाली आहे. आता ४ जानेवारीला सकाळी ही यात्रा माविकला गावातून सुरू होऊन बागपत, सिसाना, गौरीपूर वळणमार्गे गुहा मंदिरात पोहोचणर आहे. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ती काही काळ भोजन आणि विश्रांतीसाठी येथे थांबणार आहे. बुधवारी दुपारी 2 वाजता ही यात्रा पुन्हा सुरू होऊन सरूरपूरकलन गावातून बरौत शहरात दाखल होईल.

बारोट येथील छपरौली चुंगी येथे आयोजित नुक्कड सभेलाही राहुल गांधी सभा होणार आहेत. सभा संपल्यानंतर ही यात्रा शामली जिल्ह्याकडे रवाना होईल. त्यानंतर संध्याकाळी शामलीच्या अल्बम येथे यात्रा मुक्काम करणार आहे. ५ जानेवारीला सकाळी ही यात्रा कांधला, उंचगावमार्गे कैराना येथे पोहोचेल. येथून हा प्रवास शामली ते पानिपत हायवे मार्गे हरियाणाकडे रवाना होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT