Priyanka Gandhi Sarkarnama
देश

Priyanka Gandhi: बिहारच्या रिंगणात आता प्रियंका गांधींची एन्ट्री! काँग्रेसचा मोठी रणनीती

Priyanka Gandhi addressing women voters at Patna Sadaqat Ashram: बिहारमध्ये काँग्रेसची निवडणूक रणनीती मजबूत करण्यासाठी आणि महिला मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी प्रियंका गांधी पाटणा येथे येत आहेत.

Mangesh Mahale
  1. बिहार निवडणूक 2025 साठी काँग्रेसने मोठी रणनीती आखली असून विरोधी पक्षाचा आवाज मजबूत करण्याचा संकल्प केला आहे.

  2. प्रचार मोहिमेची सुरुवात प्रियांका गांधी करतील आणि महिलांशी संवाद साधत पक्षाची विचारधारा बळकट करतील.

  3. बिहारच्या निवडणुकीत महिलांच्या सहभागावर भर देत काँग्रेस ग्रामीण आणि शहरी भागात आक्रमक प्रचार करणार आहे.

Bihar Election 2025: वर्षाअखेर बिहार विधानसभेची निवडणूक होत आहे. बिहार जिंकण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. काँग्रेसने मोठी रणनीती आखली आहे. दोन दिवसापूर्वी बिहारमध्ये कार्यकारणीची बैठक झाली यात मोठे निर्णय घेण्यात आले. बिहारमधील आगामी आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि मोदी सरकारच्या विरोधात विरोधी पक्षाचा आवाज मजबूत करण्याचा संकल्प बैठकीत केला आहे.

काँग्रेस येत्या काही दिवसात भाजपच्या नाकावर टिच्चून राज्यातील ग्रामीण, शहरी भागात प्रचार अभियान सुरु करणार आहे. यात पक्षाचे वरिष्ठ नेते सहभागी होणार आहे. हे नेते विविध ठिकाणी पत्रकार परिषद घेत भाजप आणि जेडीयूला धारेवर धरणार आहे.

या अभियानाची सुरवात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रिंयका गांधी करणार आहेत. आज त्या बिहारकडे रवाना झाल्या आहेत. दुपारी बारा वाजता राजधानी पाटणा येथील सदाकत आश्रम येथे महिलांशी संवाद साधणार आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रिंयका यांचा महिला मतदारांशी संवाद महत्वाचा मानला जातो. कारण बिहारच्या राजकारणात महिलांचा सहभाग, त्यांच्या समस्या समोर आणणे हा काँग्रेसचा प्रमुख अजेंडा आहे.

प्रियंका यांचा आजचा दौरा हा महिलांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करण्यात यशस्वी ठरणार आहे. त्या अंगणवाडी महिलांशी संवाद साधणार आहेत. महिलांमध्ये पक्षाची विचारधारा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. राहुल गांधी यांच्या मतदार यात्रेचा माहौल कायम ठेवण्यासाठी प्रियकांचा आजची रॅली काँग्रेससाठी महत्वाची आहे.

FAQ

Q1. बिहार निवडणूक 2025 साठी काँग्रेसची मोठी रणनीती काय आहे?
काँग्रेसने ग्रामीण-शहरी भागात आक्रमक प्रचार मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

Q2. प्रचार मोहिमेची सुरुवात कोण करणार आहे?
काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी प्रचार मोहिमेची सुरुवात करणार आहेत.

Q3. प्रियांका गांधी बिहारमध्ये काय करणार आहेत?
महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकणार व काँग्रेसची विचारधारा मजबूत करणार आहेत.

Q4. काँग्रेस महिला मतदारांवर का लक्ष केंद्रीत करत आहे?
बिहारच्या राजकारणात महिलांचा सहभाग निर्णायक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT