Priyanka Gandhi Vadra
Priyanka Gandhi Vadra  Sarkarnama
देश

बिकिनी, घुंघट किंवा हिजाब...हा महिलांचा अधिकार; प्रियांका गांधींची वादात उडी

सरकारनामा ब्युरो

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) हिजाबचा वाद आता चांगलाच पेटला आहे. या वादाचे लोण इतर राज्यांमध्येही पसरू लागले आहे. पुदुच्चेरीमध्येही हिजाबला विरोध सुरू झाला आहे. वाद चिघळू नये, यासाठी कर्नाटकमध्ये तीन दिवस शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आता या वादात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनीही उडी घेतली आहे. (Hijab Row)

प्रियांका गांधी यांनी बुधवारी ट्विट करत हिजाब (Hijab) वादावर आपली भूमिका स्पष्टी केली. 'बिकिनी, घुंघट, जीन्स किंवा हिजाब असो, आपण काय घालावे, हे ठरवण्याचा महिलांचा अधिकार आहे. भारतीय संविधानाने त्यांना हा अधिकार दिला आहे. महिलांचा छळ थांबवा,' असं प्रियांका यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी #ladkihoonladsaktihoon या हॅशटॅगही वापरला आहे. या भूमिकेचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही समर्थन केले आहे.

दरम्यान, कर्नाटकमधील काही शाळा व महाविद्यालयांमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब (Hijab) घालून येण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बोम्मई यांनी मंगळवारी राज्यातील शाळा व महाविद्यालये पुढील तीन दिवस बंद ठेवण्याची घोषणा करावी लागली. बोम्मई यांनी याबाबतचे आदेश प्रशासनाला दिले असून सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

विद्यार्थी शिक्षक आणि शाळा व महाविद्यालयांच्या व्यवस्थापन तसेच कर्नाटकमधील नागरिकांनीही राज्यात शांतता राखावी, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. या प्रकरणावर उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत असल्याचेही बोम्मई यांनी सांगितले. दरम्यान, काही महाविद्यालयांमध्ये मंगळवारी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. त्याठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

महाविद्यालयांमध्ये पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. मंगळवारी कर्नाटकातील एका महाविद्यालयत तर बुरखा घातलेली मुस्लिम विद्यार्थिनी भगवं उपरणं घातलेल्या विद्यार्थ्यांच्या जमावाला एकटीच भिडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही विद्यार्थिनी महाविद्यालयात आपली दुचाकी पार्किंगमध्ये लावून वर्गाकडे निघाली होती. त्याचेवळी घातलेल्या विद्यार्थ्यांनी जोरजोरात जय श्रीरामच्या घोषणा देण्यास सुरूवात केली.

पण या घोषणांनी डगमगून न जाता ही विद्यार्थिनीही त्यांना भिडल्याचे व्हिडीओत दिसते. या विद्यार्थिनीनेही अल्लाह हू अकबर अशा घोषणा दिल्या. या घोषणा देतच ती वर्गाच्या दिशेने निघाली. मग विद्यार्थिही तिच्यामागे घोषणा देत निघाले. यावेळी महाविद्यालयातील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना थांबवले. या प्रकारामुळे काहीकाळ महाविद्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT