Jagan Mohan Reddy, YS Sharmila Sarkarnama
देश

Jagan Mohan Reddy : सत्ता जाताच जगनमोहन यांनी बहिणीला खेचलं कोर्टात; नेमकं काय घडलं?

YS Sharmila YSR Congress Property Dispute : जगनमोहन रेड्डी आणि वाय एस शर्मिला यांच्यामध्ये मागील तीन-चार वर्षांपासून वाद आहे.

Rajanand More

Andhra Pradesh Politics : विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री वाय. वाय. जगनमोहन रेड्डी यांनी बहिणीविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. त्यांची बहीण वाय. एस. शर्मिला या आंध्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आहेत. बहीण-भावामध्ये संपत्तीवरून वाद सुरू असल्याचे समोर आले आहे.

जगनमोहन यांनी बहीण शर्मिला यांच्यावर सरस्वती पॉवर अँड इंडस्ट्रीज या कंपनीचे शेअर परस्पर आपल्या व आई विजयम्मा यांच्या नावावर हस्तांतरित केल्याचा आरोप केला आहे. तसेच याविरोधात त्यांनी राष्ट्रीय कंपनी विधी प्राधिककरणात (NCLT) धाव घेतली आहे.

जगनमोहन यांनी केलेल्या दाव्यानुसार, कंपनीचे मालकी हक्क त्यांची पत्नी भारती यांच्याकडे आहेत. बहीण आणि भावातील राजकीय लढाईने आता कायदेशीर रुप धारण केले आहे. दोघांमध्ये संपत्तीवरून कायदेशीर लढा सुरू झाला असून त्याची सुरूवात जगनमोहन यांनी केली आहे.

मागील महिन्यातच जगनमोहन आणि त्यांच्या पत्नीने एनसीएसटीच्या हैद्राबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. शर्मिला यांनी बेकायदेशीरमध्ये हस्तांतरित केलेले शेअर्स पुन्हा आपल्याला मिळावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता शेअर्स हस्तांतरित करण्यात आले आहेत. ऑगस्ट 2019 मध्ये शर्मिला यांच्यासोबत एक करार करण्यात आला होता. त्यामध्ये रेड्डी यांनी म्हटले होते की, बहिणीवरील प्रेम आणि स्नेहाखातर मी आणि माझी पत्नी आपल्या इच्छेनुसार बहिणीला शेअर्स देऊ. पण दोघांमधील राजकीय वैर वाढत गेल्यानंतर त्याची अंमलबजावणी झाली नाही.

दरम्यान, शर्मिला यांनी 2021 मध्ये तेलंगणातून राजकीय वाटचाल सुरूवात करत स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी उघडपणे काँग्रेसला पाठिंबा दिला. तर आंध्र प्रदेशच्या निवडणुकीआधी काही महिने आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला.

त्यानंतर त्यांना पक्षाने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. परंतु, त्यांचा निवडणुकीत प्रभाव दिसून आला नाही. काँग्रेसला राज्यात एक जागा मिळाली नाही. तर जगनमोहन यांच्या पक्षाचाही दारूण पराभव झाल्याने सत्ता गमवावी लागली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT