Babu Singh Kushwaha, Rahul Gandhi Sarkarnama
देश

ED Raid : चर्चा राहुल गांधींवर ED च्या रेडची; उत्तर प्रदेशात खासदाराची मालमत्ता जप्त

Rajanand More

Uttar Pradesh : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पहाटे एक ट्विट करत खळबळ उडवून दिली. ईडीची रेड पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे ईडीच्या कारवाईबाबत उत्सुकता वाढलेली असतानाच उत्तर प्रदेशात एका खासदारांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील जौनपूर मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे खासदार बाबू सिंह कुशवाहा यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने लखनऊ येथील कुशावाहा यांची संपत्ती जप्त केली आहे. ईडीच्या टीमने बुलडोझर आणत खासदारांचे अवैध बांधकामही पाडले. कुशवाहा यांनी जौनपूर मतदारसंघात भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांचा पराभव केला आहे.

मागील दहा वर्षांपासून कुशवाहा यांच्यावर मनी लाँर्डिंग कायद्यांतर्गत ईडीकडून कारवाई सुरू आहे. त्याचप्रमाणे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. विविध घोटाळ्यांतील रक्कम त्यांनी बेनामी संपत्तीत गुंतवल्याचा दावा ईडीने केला आहे. या मालमत्तांचा शोध घेत ईडीने कारवाई केली जात आहे. आतापर्यंत तब्बल अडीचशे कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या ट्विटमुळे राजकारण तापलं आहे. "टू इन वनला माझे 'चक्रव्यूह' भाषण आवडलं नाही, हे जाहीर आहे. 'ईडी'तील काही लोकांनी मला सांगितलं की, छापे टाकण्याची योजना बनविण्यात येत आहे, असे राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

राहुल यांच्या या ट्विटरवर भाजपमधील नेत्यांनी टीका केली आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी तर संबंधित ईडीतील अधिकाऱ्याचे नाव सांगावे, अशी आव्हान राहुल यांना दिले आहे. तसेच लोकसभेसह बाहेरही ते सातत्याने खोटं बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT