atul benke sarkarnama
देश

Atul Benke : राष्ट्रवादीच्या आमदाराला साडेसात हजार महिलांनी बांधल्या राख्या..

Atul Benke :पुढची पिढी सुसंस्कृत राहील.त्यांचे भविष्य सुरक्षित राहील या साठी मी कटिबद्ध आहे. हा रेशमी धागा आयुष्यभर अतूट राहील," आशी ग्वाही आमदार अतुल बेनके यांनी दिली.

रवींद्र पाटे

नारायणगाव : माजी आमदार वल्लभ बेनके यांनी सुरू केलेली रक्षाबंधनाची परंपरा आमदार अतुल बेनके (atul benke) यांनी सुरू ठेवली आहे. काल (गुरुवार) दिवसभरात साडेसात हजार महिलांनी आमदार बेनके यांना राखी बांधून त्यांना आशीर्वाद दिले. (atul benke news update)

आमदार बेनके यांचे दोन्ही हात राखींनी भरून गेले होते. या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.राखी बांधणाऱ्या महिला या मोठया प्रमाणात शेतकरी कुटुंबातील होत्या. राखी बांधल्या नंतर महिला आमदार बेनके यांच्या समवेत सेल्फी काढत होत्या.

मागील दोन वर्षे कोरोनामुळे रक्षाबंधन कार्यक्रम झाला नव्हता. या वर्षी माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या निवासस्थानी रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला तालुक्यातील महिलांकडुन उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

"नारायणगाव तालुक्यातील महिला भगिनी व मातांच्या संरक्षणाची जबाबदारी भावासारखे स्वीकारली आहे. त्यांच्या सुखदुःखात माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या प्रमाणेच मी खंबीरपणे उभा आहे. प्रत्येक कुटुंब समृद्ध होईल. पुढची पिढी सुसंस्कृत राहील.त्यांचे भविष्य सुरक्षित राहील या साठी मी कटिबद्ध आहे. हा रेशमी धागा आयुष्यभर अतूट राहील," आशी ग्वाही आमदार अतुल बेनके यांनी दिली.

आमदार बेनके म्हणाले, "माझे वडील माजी आमदार वल्लभ बेनके यांनी सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. त्यांनी उभ्या केलेल्या विकासाच्या पायावर मी पुढे काम करत आहे.माता भगिनींच्या प्रेमामुळे व दिलेल्या आशीर्वादामुळे मी भारावून गेलो असून माझी जबाबदारी वाढली आहे. माता भगिनींच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. त्यांचे संरक्षण करण्यासाठी बेनके कुटूंबिय कटिबद्ध आहे,"

कार्यक्रमाचे नियोजन युवा नेते अमित बेनके, गौरी बेनके, धनश्री बेनके, शीतल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उन्नती फाउंडेशन व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला पदाधिकारी यांनी केले होते.सूत्रसंचालन संतोष ढोबळे यांनी केले.

"आमदार अतुल बेनके नेहमीच गरजू, गोर गरीब यांच्या मदतीला धावून जातात. सर्व घटकांच्या विकासासाठी ते प्रयत्नशील आहेत. आम्ही सुचवलेली विकास कामे ते प्राधान्याने करतात. खऱ्या अर्थाने ते आमचे कुटूंब प्रमुख आहेत.आमचा भाऊ आमदार झाला याचा आम्हा महिलांना अभिमान आहे," असे माजी उपसभापती सुरेखा वेठेकर म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT