AAP MLA Balbir Singh Latest Marathi News
AAP MLA Balbir Singh Latest Marathi News Sarkarnama
देश

मेव्हणीशी भांडण पडलं महागात; आमदारासह पत्नी व मुलाला तीन वर्षांचा कारावास

सरकारनामा ब्युरो

चंडीगड : मारहाणीच्या गुन्ह्यात एक वर्षांची शिक्षा भोगत असलेले काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्यानंतर आता पंजाबमधील आणखी एका नेत्याला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जमीन व पाण्याच्या वादावरून मेव्हणीशी झालेले भांडण त्यांना महागात पडले आहे. (AAP MLA Balbir Singh Latest Marathi News)

आम आदमी पक्षाचे आमदार बलबीर सिंग यांना एका प्रकरणात ही शिक्षा झाली आहे. त्यांच्या पत्नी व मुलगाही या प्रकरणात दोषी आढळला असून त्यांनाही तीन वर्षांची शिक्षा झाली आहे. बलबीर सिंग, त्यांच्या पत्नी सुरिंदर कौर सैनी, मुलगा राहुल आणि अन्य दोषी परमिंदर सिंह यांना न्यायालयाने दोषी धरले आहे.

मुख्य न्यायदंडाधिकारी रवि इंदर सिंह यांनी हा निकाल दिला आहे. पण त्यानंतर बलबीर यांच्यासह सर्वांना जामीनही देण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांना उच्च न्यायालयात या निकालाविरोधात दाद मागता येईल. (Balbir Singh convicted in criminal case)

काय आहे प्रकरण?

आमदार बलबीर सिंग हे पतियाळा ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. पण हे प्रकरण 2011 मधील आहे. त्यांची मेव्हणी रुपिंदर कौर आणि त्यांचे पती सेवानिवृत्त विंग कमांकडर मेवा सिंह यांनी तक्रार दिली होती. त्यांच्यामध्ये चमगौर साहिबमधील एका गावांत पाण्यावरून वाद झाला होता. तिथेच बलबीर सिंग व इतरांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले होते. हे प्रकरण आता बलबीर सिंग यांना आमदार झाल्यानंतर भोवले आहे.

सिध्दूंना एक वर्षांची शिक्षा

काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू यांना 34 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर लगेच शरण येणं टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं तातडीनं दिलासा देण्यास नकार दिल्यानं सिद्धू नुकतेच हे पतियाळा न्यायालयात शरण आले आहेत. (Congres Leader Navjot Singh Sidhu News)

या प्रकरणाची सुनावणी तीन दशकांहून अधिक काळ सुरू होती. त्यामध्ये न्यायालयाने सिध्दूंनी एक वर्षाची शिक्षा ठोठावली. ते आज न्यायालयासमोर शरण येणार, अशी चर्चा होती. पण त्यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. आरोग्याच्या कारणांमुळे शरण येण्यासाठी काही आठवड्यांचा वेळ मिळावा, अशी विनंती करण्यात आली होती. पण तातडीनं दिलासा न मिळाल्यानं सिद्धू हे अखेर पतियाळा न्यायालयासमोर शरण आले.

सिद्धू आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पातियाळातील रहिवासी गुरनामसिंग यांच्याशी 1988 मध्ये भांडण झालं होत. पार्किंगच्या जागेवरून हा वाद झाला होता. सिद्धू आणि त्यांचे सहकारी रुपिंदरसिंग संधू यांनी गुरनाम यांना कारमधून बाहेर ओढून मारहाण केली होती. यात गुरनामचा मृत्यू झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT