Punjab Cabinet
Punjab Cabinet Twitter
देश

१२ वी पास मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात डॉक्टर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे पदवीधर

सरकारनामा ब्युरो

अमृतसर : पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कॅबिनेटचा पहिला विस्तार आज पार पडला. मान यांच्या या कॅबिनेटमध्ये १० मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात ९ पुरुष आणि १ महिला मंत्र्यांचा समावेश आहे. पंजाबच्या या मंत्रिमंडळाकडे नजर टाकल्यास एका पेक्षा एक मंत्री उच्च शिक्षीत असल्याचे दिसून येते. सुरुवात पंजाबच्या मुख्यमंत्र्यांपासून केल्यास भगवंत मान हे १२ वी पास आहेत. त्यांनी बीकॉमसाठी प्रवेश घेतला होता, मात्र शिक्षण पूर्ण करु शकले नाहीत.

तर मंत्र्यांमध्ये शेतकरी ते डॉक्टर अन् लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्सच्या पदवीधरांचा समावेश आहे. यात गत विधानसभेतील विरोधी पक्ष नेते आणि दुसऱ्यांदा आमदार बनलेले हरपालसिंग चीमा हे आज मंत्री बनले आहेत. ते व्यवसायाने वकिल आहेत. आम आदमी पक्षाचे माजी खासदार साधु सिंग यांची मुलगी डॉ. बलजीत कौर यांचाही आजच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. कौर यांनी तीन महिन्यांपूर्वीच नोकरी सोडून पक्षात प्रवेश केला होता.

हरभजन सिंग हे २०१२ मध्ये पंजाब लोकसेवा आयोगाची परिक्षा पास झाले होते. यात ते Excise & Taxation विभागात सेवेत रुजू झाले होते. मात्र २०१७ साली त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि निवडणुकीच्या राजकारणात आले. तेव्हा ते पराभूत झाले मात्र यंदा ते निवडून आले आणि मंत्री देखील झाले. आमदार डॉ. विजय सिंगला यांचाही आजच्या मंत्रिमंडळाच्या यादीत समावेश आहे. ते पेशाने डेंटिस्‍ट आहेत. तर लालचंद कटारुचक्‍क हे पेशाने समाजसेवक आहेत.

आम आदमी पक्षाच्या पंजाब युथ विंगचे अध्यक्ष आणि दुसऱ्यांदा आमदार बनलेले गुरमीत सिंग मीत हेयर यांचाही समावेश आहे. त्यांचे बीटेक पुर्ण झाले आहे. शेतीकरी कुलदीप सिंग धालीवाल आणि लालजीत सिंग भुल्‍लर यांनीही आज मंत्रि म्हणून शपथ घेतली आहे. स्वतःचा व्यवसाय असलेले ब्रम्ह शंकर जिंपा आणि लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिटीकल सायन्समधून राज्यशास्त्रचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या हरजोत सिंग बेंस यांचाही समावेश मंत्रिमंडाळत झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT