Bhagwant Maan, Arvind Kejriwal Sarkarnama
देश

CM Bhagwant Mann on BJP: दिल्लीत सत्ता मिळताच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले...

Delhi MCD Election : दिल्ली महापालिकेत आपची एकहाती सत्ता

सरकारनामा ब्यूरो

Delhi MCD Election : दिल्ली महानगरपालिका (MCD) निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीने (AAP)जोरदार मुसंडी मारली आहे. महापालिकेत आपची सत्ता स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचा बहुमतापेक्षा अधिक जागांवर विजय झाला आहे.

दुसरीकडे १५ वर्ष सत्तेत असलेल्या भाजपला धक्का देत आप सत्तेत येणार आहे. एमसीडी निवडणुकीच्या निकालांमध्ये आपच्या चांगल्या कामगिरीबद्दल पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मान म्हणाले, दिल्लीतून काँग्रेसची 15 वर्षांची सत्ता उलथून टाकली होती. आता आम्ही भाजपची 15 वर्षांची एमसीडीतील सत्ता देखील उलथून टाकली आहे.

याचा अर्थ लोकांना द्वेषाचे राजकारण आवडत नाही. लोक वीज, स्वच्छता, पायाभूत सुविधा यांना मतदान करतात. आता दिल्ली स्वच्छ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आप नेते सौरभ भारद्वाज हे एका मुलाखतीत म्हणाले होते की, "सरकारी कर्मचाऱ्यांनी भीतीपोटी भाजपला (BJP) मतदान केले असावे. जर त्यांनी मतमोजणी केली तर कळेल की त्यांनी कोणाला मत दिले आहे, अशा परिस्थितीत पोस्टल मतमोजणीनंतरचा प्रारंभिक कल सामान्यतः सरकारच्या बाजूने असतो. ईव्हीएम उघडल्यावर तुम्हाला निर्णयक बदलेला दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

2017 च्या निवडणुकीत भाजपने 270 पैकी 181 जागा जिंकल्या होत्या, तर आपने 48 जागा जिंकल्या होत्या. त्याचवेळी 30 प्रभागात विजय मिळवत काँग्रेस (Congress) तिसऱ्या क्रमांकावर होती. या निवडणुकीत 'आप'ने १३८ महिला उमेदवार उभे केले आहेत, तर भाजप आणि काँग्रेसने अनुक्रमे १३६ आणि १२९ उमेदवार उभे केले आहेत.

आतापर्यंत पूर्ण २५० जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यामध्ये आपने 134 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपने 104 जागांवर विजय मिळवला आहे. मात्र, काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. त्यांना अवघ्या 9 जागांवर यश मिळाले आहे. अपक्षांनी 3 जागांवर विजय मिळवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT