देश

जनरल बजवा, तुम्हाला सरळ करू - कॅप्टन अमरिंदरसिंग

सरकारनामा ब्युरो

पुणे - पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करीत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बजवा यांना चांगलाच दम भरला आहे. 

`पंजाबला अस्थिर करण्याचा थोडा जरी प्रयत्न केला, तरी तुम्हाला आम्ही सरळ करू,' अशा शब्दांत बजवांना अमरिंदरसिंग यांनी सुनावले आहे. पंजाब विधानसभेमध्ये पुलवामामध्ये शहीद झालेल्यांना आदरांजली वाहून मुख्यमंत्र्यांनी शोकप्रस्ताव ठेवला. त्यावेळी कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पाकिस्तानच्या दुटप्पी चालीवर चांगलाच हल्ला चढवला. पाकिस्तानचे पंतप्रधान शांततेसाठी प्रयत्न करतात. त्याचवेळी जनरल बजवा आयएसआयच्या माध्यमातून युद्ध छेडते. त्यामुळे `इनफ इज इनफ.' 

पुलवामासारखा प्रयत्न पंजाबात केल्यास बजवांना सरळ करू, असा इशारा देताना कॅप्टन म्हणाले, की आजचा पंजाब 1970 आणि 80 च्या दशकातला नाही. त्यावेळी पंजाबला अशांत केले. 1800 पोलिस कर्मचारी मारले गेले. आज पंजाबचे पोलिस बल अधिक कुशल आणि मजबूत आहे. जनरल बजवा तुम्ही पंजाबी आहात आणि आम्हीही. तुम्ही काही करायचा प्रयत्न केला, तर तिथेच सरळ करू. आमच्या नादी लागू नका.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT