Bhagwant Mann & Arvind Kejriwal
Bhagwant Mann & Arvind Kejriwal  Sarkarnama
देश

अॅक्शन प्लॅन ठरला; मुख्यमंत्री प्रत्येक मंत्र्यांना टार्गेट देणार अन् पूर्ण न झाल्यास...!

सरकारनामा ब्युरो

चंडीगड : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी आपल्या प्रत्येक मंत्र्यांसाठी एक टार्गेट निश्चित केले आहे. हे टार्गेट दिलेल्या वेळेत पूर्ण न झाल्यास त्यांचं मंत्रिपदही जाऊ शकते, असा सूचक इशारा आम आदमी पक्षाचे (AAP) प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी रविवारी दिला. हे टार्गेट पूर्ण न केल्यास नागरिकच मंत्र्यांना हटवण्याची मागणी करतील, असं केजरीवाल म्हणाले.

पंजाबमध्ये (Punjab) ऐतिहासिक विजय मिळवर आपने सत्ता मिळवली आहे. मुख्यमंत्री मान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कामांचा धडाका सुरू केला आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी हेल्पलाईन सुरू करत त्यांनी आपल्या कामाची दिशी निश्चित केल्याचे मानले जात आहे. त्यानंतर त्यांनी मंत्र्यांनाही कामांसाठीचे टार्गेट निश्चित करून दिल्याचे समजते. त्यांनी मंत्र्यांनी त्यासाठीचा वेळही निश्चित केला आहे. याबाबतचे संकेत केजरीवाल यांनीच दिले आहेत.

केजरीवाल यांनी रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नवीन मंत्र्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, मान यांनी सुरूवातीला जुन्या मंत्र्याची सुरक्षा काढली असून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं आहे. मंत्र्यांना टार्गेट दिले असून वेळेत पूर्ण झाल्यास नागरिकच त्यांना हटवण्याची मागणी करतील. मान यांनी भ्रष्टाचाराविरोधात पाऊल टाकले आहेत. त्यांनी राज्यात 25 हजार जागांसाठी भरती प्रक्रियेचीही घोषणा केली आहे. त्यामध्ये 10 जागा एकट्या पोलिस दलातील आहेत.

पक्षाच्या आमदारांनी लोकांमध्ये फिरले पाहिजे. गावांमध्ये गेले पाहिजे. पंजाबमधील लोकांनी हिरे निवडले असून आपल्याला 92 जणांची टीम म्हणून मान यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. मी फक्त त्यांचा मोठा भाऊ आहे. कामाच्या बाबतीत आमदारांनी सतर्क राहायला आहे. आपल्या मतदारसंघात प्रत्येक गावात कार्यालय हवे. दिवसातील किमान 18 तास काम करावे, असा कानमंत्रही केजरीवाल यांनी आमदारांना दिला.

मी दिल्लीतून सगळ्यांचे काम पाहणार आहे. प्रत्येक आमदार आणि मंत्र्याबाबत लोकांकडून माहिती घेतली जाईल. मागील वर्षी काही आमदारांबाबत नकारात्मक प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यांचं तिकीट कापून इतरांना संधी देण्यात आले. ते निवडूनही आले, असं वक्तव्य केजरीवाल यांनी केलं. दरम्यान, एका महिला आमदारांसह 10 आप आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT