Rahul Gandhi At Wayanad Sarkarnama
देश

Rahul Gandhi At Wayanad : राहुल अन् प्रियांका उतरले चिखलात; वायनाडमधील आक्रोश काळजाला भिडणारा...

landslide hit Wayanad Kerala : केरळच्या वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात किमान 256 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Rashmi Mane

Rahul Gandhi At Wayanad : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) वाड्रा आज केरळमधील वायनाड येथे दुर्घटनाग्रस्तांच्या भेट घेण्यासाठी आज वायनाड येथे पोहोचले आहेत. केरळच्या वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात किमान 256 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे वायनाडच्या चोरमलमाला येथे भूस्खलन झालेल्या ठिकाणी राहुल गांधी भेट देत आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनग्रस्त भागात उभारण्यात आलेल्या विविध मदत शिबिरांना भेट दिल्या आहेत तसेच पीडित कुटुंबांची भेट घेतली आहे. वायनाडमधील आक्रोश काळजाला भिडणारा आहे. कुटुंबच्या कुटुंब भूस्खलनात वाहून गेली आहेत. वायनाड येथील भूस्खलनामुळे चार गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. एनडीआरएफची टीम तसेच अनेक पथके बचाव कार्यात गुंतलेली आहेत.

चार गावे पूर्णपणे उद्ध्वस्त

सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री वायनाडमध्ये अतिवृष्टी झाली. वायनाडमधून येणारे फोटो तेथील विध्वंस दाखवत आहे. साधारण पहाटे 1 ते पहाटे 5 च्या दरम्यान तीन वेळा भूस्खलन झाले त्यामुळे चेलियार नदीच्या पाणलोटात वसलेल्या चुरामाला, अट्टमला, नूलपुझा आणि मुंडक्काई ही चार गावे उद्ध्वस्त झाली आहेत.

राहुल गांधी यांनी लोकसभेत वायनाडचे प्रतिनिधित्व केले आहे. या लोकसभा निवडणुकीतही ते रायबरेलीसह वायनाडमधून निवडून आले, पण त्यांनी केरळमधील लोकसभा मतदारसंघातून राजीनामा दिला. आता त्यांची बहीण प्रियांका गांधी वढेरा वायनाडच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार असणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT