Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांची सध्या भारत जोडो यात्रा (bharat jodo yatra) सुरु आहे. या यात्रेत ते नेहमी पांढरा टी-शर्ट परिधान केलेले दिसतात. त्यांच्या या टी-शर्टवरुन समाज माध्यमांवर चर्चाही सुरु असतात.
भाजप नेत्यांनी या टी-शर्टवरुन राहुल गांधी यांच्यावर अनेक वेळा टीका केली आहे. इतक्या थंडीत ते स्वेटर परिधान न करता टी-शर्ट का परिधान करतात, असा प्रश्न विचारला जातो. या प्रश्नाला खुद्द राहुल गांधींनी यांनीच उत्तर दिले आहे. आपल्या टी-शर्ट होत असलेल्या टीकेवर त्यांनी खेद व्यक्त केला.
भारत जोडो यात्रेदरम्यान ऊन, पाऊस, थंडी अशा वातावरणात राहुल गांधी हे टी-शर्ट परिधान केलेले दिसतात. शनिवारी त्यांना याबाबत एका पत्रकाराने विचारले की इतक्या थंडीत तुम्हाला थंडी वाजत नाही का ? यावर राहुल गांधी म्हणाले, "माझ्या टी-शर्ट विषयी काहींनी अडचण का आहे. मी स्वेटर परिधान करावे, अशी त्यांची इच्छा आहे का? मी स्वेटर परिधान करीत नाही, कारण मला थंडी जाणवत नाही. जेव्हा मला थंडी जाणवेल तेव्हा मी स्वेटर परिधान करेल.
काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी हे २०२४ ला पंतप्रधान पदाचा चेहरा असतील, असं मोठं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी शनिवारी केलं. या पार्श्वभूमीवर बोलताना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारीवर आमचा विरोध नाही, असं भाष्य आज केलं. त्यामुळे २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधींच असतील का? अशी चर्चा अता सुरू झाली आहे.
नितीशकुमार म्हणाले, "राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून आम्हाला कोणतीही अडचण नाही. मात्र यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एक निर्णय घेण्याची गरज आहे. याबाबत आम्हाला कोणताही आक्षेप नाही. पण यावर एक बैठक घेऊन सविस्तर चर्चा झाली पाहिजे'', असं मत त्यांनी व्यक्त केलं.
राहुल गांधी यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत विविध विषयावर भाष्य केलं. यावेळी त्यांना तुम्ही पंतप्रधान झालात तर सर्वात आधी काय कराल? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर 'मी पंतप्रधान झालो तर सर्वात आधी तीन कामं करेन, असं सांगत राहुल गांधींनी पत्रकारांच्या सर्व प्रश्नांचा उत्तरं दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.