Madhya Pradesh Assembly Election News : या वर्षाच्या आखेरीस मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यासाठी आता पासूनच राजकीय वातावरण तापले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) काँग्रेस 150 जागा जिंकेल असा दावा केला आहे. निवडणुकीच्या तयारीसंदर्भात दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीनंतर त्यांनी हा दावा केला. राहुल गाधी यांच्या दाव्यानुसार खरच काँग्रेस जागा जिंकणार का? असा सवाल विचारला जात आहे.
मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने विशेष रणनीती आखली आहे. 2018 च्या निवडणुकीत काँग्रेसने 230 पैकी 114 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपने 109 जागा जिंकल्या होत्या. मात्र, या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने 150 जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले आहे. त्यामध्ये काँग्रेस 'मिशन-66'वर काम करत आहे. या जागा मागील अनेक निवडणुकीमध्ये काँग्रेसने जिंकलेल्या नाहीत.
तर कर्नाटकप्रमाणेच माळव्यातही राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) 'भारत जोडो' यात्रेमुळे फायदा होऊल, असे सांगितले जात आहे. काँग्रेसने मालवा प्रदेशातून भारत जोडो यात्रा काढली होती. त्यामध्ये सहा जिल्हे आहेत, त्यामध्ये विधानसभेच्या 30 जागा आहेत. त्यापैकी 2018 मध्ये काँग्रेसने 15 आणि भाजपने (BJP) 12 जागा जिंकल्या होत्या. अपक्षांनी तीन जागा जिंकल्या. यापैकी बुरहानपूर आणि खरगोन हे दोन जिल्हे असे आहेत, ज्यात भाजपचे खातेही उघडले नाही. येथेही अधिक जागा जिंकण्याची काँग्रेसची (Congress) रणनीती आहे.
ग्वाल्हेर-चंबळमध्ये सिंधियाच्या बंडखोरीमुळे नाराजीचा फायदा मिळेल असे काँग्रेसला वाटते. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडखोरीचा यावेळच्या विधानसभा निवडणुकीत पुरेपूर फायदा होईल, अशी काँग्रेसला आशा आहे. 2018 मध्ये काँग्रेसने येथील 31 पैकी 24 जागा जिंकल्या होत्या. भाजपच्या खात्यात केवळ 6 जागा आल्या, तर बसपाला एक जागा मिळाली होती.
2018 मध्ये महाकौशलमध्ये ज्याप्रकारे 38 पैकी 24 जागा जिंकल्या होत्या, त्याच प्रमाणे जुन्या जागा पुन्हा निवडून येतील आणि त्यामध्ये वाढ होईल, असे काँग्रेसला वाटते. या भागातील 8 पैकी 5 जिल्हे आदिवासीबहुल असून तेथे काँग्रेसचा प्रभाव आहे. त्यामुळेच काँग्रेस महाकौशलमधून निवडणूक प्रचाराला सुरुवात करत आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.