Rahul Gandhi News : उत्तराखंडमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भाषण केले होते. या भाषणानंतर भाजपसंबधीत लोकांनी तेथे शुद्धीकरण केले होते. 8 ऑगस्टला ही घटना घडली होती. या विषयी आता राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधानांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले पाहिजेत असे राहुल गांधी म्हणाले.
ते म्हणाले, आम्ही काँग्रेस अध्यक्षांसाठी उत्तराखंडमध्ये न्यायाची मागणी करत आहोत. हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे कर्तव्य आहे की त्यांनी खर्गेजी यांना न्याय मिळवून द्यावा.
आमचे राजस्थानचे नेते मंदिरात जातात, तेव्हा भाजपचे लोक शुद्धीकरण करतात. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेजी यांनी आपले पूर्ण आयुष्य देशासाठी आणि संविधानासाठी दिले, ते जेव्हा हल्द्वानीच्या रामलीला मैदानात भाषण देतात, तेव्हा तिथे नंतर शुद्धीकरण केले जाते! बिहारचे माजी मुख्यमंत्री मांजी जी मंदिरात जातात, तेव्हा शुद्धीकरण केले जाते.
८ ऑगस्टला खरगे जी यांची सभा होते, आणि १० ऑगस्टला भाजप-आरएसएसचे कार्यकर्ते तिथे जाऊन शुद्धीकरण करतात. आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा असा अपमान होतो, हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
'शुद्धीकरण' म्हणजेच अस्पृश्यतेचे दुसरे रूप आहे. संविधानाने अस्पृश्यता बेकायदेशीर ठरवली आहे, पण भाजपचे लोक उघडपणे अस्पृश्यतेचे पालन करत आहेत, अशी टीका देखील त्यांनी केली.
राहुल गांधी म्हणाले, देशात दोन विचारधारांमध्ये लढाई सुरू आहे. डॉक्टर आंबेडकर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल यांच्या संविधानाची विचारधारा आणि दुसरी भाजप आणि आरएसएस (RSS) ची विचारधारा. आज हिंदुस्तानात जे काही राजकारण चालले आहे, ते या दोन विचारधारांमधील लढाई आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.