Rahul Gandhi 
देश

Rahul Gandhi: राहुल गांधींनी आकडेवारीचा बॉम्ब टाकताच निवडणूक आयोगानं दिलं चॅलेंज! कायद्यातील 'या' कलमानुसार, आजच संध्याकाळी...

Rahul Gandhi: देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतांची चोरी झाल्याचा आरोप लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी केला आहे.

Amit Ujagare

Rahul Gandhi: देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतांची चोरी झाल्याचा आरोप लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी एक प्रकारे बॉम्बच टाकला आहे. त्यांच्या या पत्रकार परिषदेनंतर थेट निवडणूक आयोगानंच त्यांना आव्हान दिलं आहे. कायद्यातील तरतुदींचा उल्लेख करत आजच संध्याकाळी याबाबत आयोगाते येऊन भेटण्याची सूचना त्यांना करण्यात आली आहे. यासंदर्भात ट्विट करत आयोगानं त्यांना आव्हान दिलं आहे.

आयोगानं काय म्हटलं?

आपल्या फॅक्टचेकमध्ये निवडणूक आयोगानं म्हटलं की, मतदानाची चोरी हा आपल्या देशावर टाकलेला अॅटम बॉम्ब असल्याचा राहुल गांधींनी केलेला उल्लेख हा दिशाभूल करणारा आहे. त्यामुळं जर राहुल गांधींना वाटत असेल की ते खरं बोलत आहेत तर त्यांनी मतदारनोंदणी कायदा १९६० च्या कलम २० (३)(ब) अंतर्गत प्रतिज्ञापत्रावर तसं लिहून द्यावं आणि ते कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडं आजच संध्याकाळी स्वतः सबमिट करावं. कारण त्यामुळं पुढील आवश्यक कारवाई आम्हाला करता येईल. पण जर राहुल गांधी जे काही बोलत आहेत यावर त्यांचाच विश्वास नसेल तर त्यांनी अशा पद्धतीचे चुकीचे निष्कर्ष काढणं थांबवाव तसंच देशातील जनतेची दिशाभूल करणं थांबवावं.

राहुल गांधींनी काय म्हटलं?

राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत आरोप केला होता की, महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर राज्यांतील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार झाले आहेत. यांमध्ये लाखो अशी नावं टाकण्यात आली आहेत जी अयोग्य आहेत. तर लाखो योग्य मतदारांची नावं या याद्यांमधून वगळण्यात आली आहेत. राहुल गांधींनी याला मतांची चोरी असं संबोधलं आहे. तसंच म्हटलं की, निवडणूक आयोगाची निष्पक्षता आणि विश्वसनीयतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

दरम्यान, नुकतंच कर्नाटकच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी देखील राहुल गांधींना पत्र लिहून त्यांच्याकडं असलेली आक्षेपाची सर्व माहिती प्रतिज्ञापत्रावर देण्याची मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT