Rahul Gandhi  Sarkarnama
देश

Congress Politics : राहुल गांधींच्या पाचव्या निकटवर्तीय नेत्याला मुख्यमंत्रिपदावरून डावललं? एकाने यापूर्वीच काँग्रेस सोडून केलाय भाजपमध्ये प्रवेश

Rahul Gandhi K. C. Venugopal : काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांच्याच निकटवर्तीय मुख्यमंत्री होत नाही, अशी चर्चा सुरू झाली. एक दोन नव्हे तर तब्बल पाच जणांना मुख्यमंत्रि‍पदापासून मुकावे लागले आहे.

Roshan More

Congress News : नुकत्याचा झालेल्या विधानसभा निवडणुकीत केरळमध्ये काँग्रेस आघाडीला बहुमत मिळाले. मुख्यमंत्रि‍पदासाठी सर्वात आघाडीवर नाव होते ते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय केसी वेणूगोपाल यांचे. वेणूगोपाल हे मुख्यमंत्री होतील हे निश्चित मानले जात होते. मात्र, निकलाच्या दहा दिवसानंतर सर्व आमदार, स्थानिक नेते यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्रि‍पदी व्ही डी सतीशन यांचे नाव निश्चित करण्यात आले. त्यांच्या नावाची देखील घोषणा करण्यात आली.

काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांच्याच निकटवर्तीय मुख्यमंत्री होत नाही, अशी चर्चा सुरू झाली. कारण वेणूगोपाल हे पहिले नेते नाहीत जे राहुल गांधींच्या निकटवर्तीय असून मुख्यमंत्रि‍पदापासून डावलेले गेले. याआधी चार नेत्यांना याचा अनुभव आला आहे.

मध्यप्रदेशमध्ये 2018 मध्ये काँग्रेसचे सरकार आले होते. पक्षाला काठावरचे बहुमत होते. त्यावेळी विधीमंडळाच्या बैठकीत सर्व नेत्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नावाला पसंती दिली. ते राहुल गांधी यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून तेव्हा प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांची निवड होणार हे निश्चित मानले जात असताना ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री म्हणून करण्यात आली. पुढे नाराज सिंधिया यांनी काँग्रेसची साथ सोडून थेट भाजपमध्ये प्रवेश केला.

राहुल यांच्या यंग ब्रिगेडमधील आणखी एक महत्त्वाचे नेते म्हणून राजस्थानमधील सचिन पायलट यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांनी अख्या राजस्थान पिंचून काढत काँग्रेसची सत्ता पुन्हा आणण्यात 2018 मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, त्यांच्या हाती निराशाच आली राहुल गांधींचे जवळचे नेते असूनही मुख्यमंत्रि‍पदी अनुभवी अशोक गेहलोत यांना मिळाले.

टीएस सिंहदेवही नाराज

ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट यांच्यासोबत झाले तेच छत्तीसगडमध्ये टीएस सिंहदेव यांच्यासोबत झाले. सत्ता आल्यानंतर भूपेश बघेल यांना मुख्यमंत्रिपद मिळाले. तर, टीएस सिंहदेव यांना उपमुख्यमंत्रिपदी समाधान मानावे लागले.

कर्नाटकमधील डीके शिवकुमार यांच्याबाबत देखील हीच चर्चा आहे. ते राहुल गांधी यांचे निटवर्तीय आहेत. मात्र, मुख्यमंत्रि‍पदाच्या खुर्चीने त्यांना चकवा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT