Rahul Gandhi, Bharat Jodo Yatra Latest News  Sarkarnama
देश

Rahul Gandhi : पोलीस संरक्षणाअभावी राहुल गांधींनी काश्‍मीरमधील भारत जोडो यात्रा स्वत:पुरती थांबविली

Bharat Jodo Yatra : स्थानिक पोलीसांवर केले आरोप; इतर सहकाऱ्यांना यात्रा पूर्ण करण्याचे आवाहन

सरकारनामा ब्यूरो

काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा आता जम्मू काश्मीरमध्ये आहे. तेथे मात्र सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक पोलिसांचे कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करीत राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत तात्पुरता सहभाग घेणार नसल्याचे सांगितले आहे.

राहुल गांधी म्हणाले की, यात्रेतील गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण जात आहेत. तसेच पोलीस कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मी ही यात्रा माझ्यापुरती थांबवत आहे. मात्र देशातील दुही संपण्यासाठी सुरू केलेली ही भारत जोडो यात्रा इतर सहकाऱ्यांनी पूर्ण करावी, असे आवाहनही राहुल गांधी यांनी केले आहे.

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून भारत देश पायी पिंजून काढला. त्यांच्या या यात्रेचे सर्वांकडून कौतूक करण्यात येत आहे. आता ही यात्रा जम्मू काश्मीरमधील आनंतनाग (Anantnag) जिल्ह्यात आहे. तेथे राहुल गांधी यांच्या सुरक्षेची जाबाबदारी असलेल्या 'सीआयएसएफ'ने (CISF) चिंता व्यक्त केली.

सुरक्षा यंत्रणेनेकडून सांगण्यात आले की, आनंतनागमधील भारत जोडो यात्रेतील पोलीस बंदोबस्त पूर्णपणे कोलमडला आहे. गर्दीचे व्यवस्थापन करणारे पोलीस कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे यापुढे राहुल गांधी यांनी यात्रेत सहभाग घेणे धोक्याचे ठरू शकते. यावर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आनंतनाग येथून यात्रेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

राहुल गांधी म्हणाले, "स्थानिक पोलिसांकडून यात्रेतील सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही. येथे यात्रेदरम्यान होणाऱ्या गर्दीवर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे माझी सुरक्षा करणाऱ्या लोकांनी मी यापुढे यात्रेत सहभागी होणे धोक्याचे ठरू शकते, असे सांगितले. तसेच सुरक्षेबाबत चिंताही चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे यापुढे माझा यात्रेत प्रत्यक्ष सहभाग नसेल. मात्र, इतरांनी ही यात्रा पूर्ण करावी."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT