Rahul Gandhi Has to Resign From Wayanad Lok Sabha Constituency Sarkarnama
देश

Rahul Gandhi:राहुल गांधी राजीनामा देणार; वायनाडमधून प्रियांका लढणार?

Rahul Gandhi Has to Resign From Wayanad Lok Sabha Constituency:रायबरेलीशी गांधी परिवारांचे जुने सलोख्याचे संबंध आहेत.राहुल गांधींनी रायबरेलीलाच प्राधान्य द्यावे, अशी रायबरेलीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांचीही इच्छा आहे, रायबरेलीची जागा सोडू नये, असा दबाब पक्षश्रेष्ठींचा त्यांच्यावर आहे.

सरकारनामा ब्यूरो

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून विजय मिळवला आहे. यातील एका मतदारसंघातील खासदारकीचा ते राजीनामा देणार आहेत. या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी या उमेदवार असतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

रायबरेली आणि वायनाड पैकी कोणती जागा राखायची यावर काँग्रेस खासदार राहुल गांधी सध्या विचार करीत आहेत. राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड या दोन्हीमधून विजयी झाले आहेत, परंतु त्‍यांना एका मतदारसंघात राजीनामा द्‍यावा लागणार आहे. त्‍यांनी वायनाड मतदारसंघातील (Wayanad )जागेचा राजीनामा देण्‍याचा निर्णय घेतल्‍याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

रायबरेलीशी गांधी परिवारांचे जुने सलोख्याचे संबंध आहेत.राहुल गांधींनी रायबरेलीलाच प्राधान्य द्यावे, अशी रायबरेलीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांचीही इच्छा आहे, रायबरेलीची जागा सोडू नये, असा दबाब पक्षश्रेष्ठींचा त्यांच्यावर आहे.रायबरेली ही जागा राहुल गांधी ठेवतील, असे राजकीय विश्लेषक सांगतात.

2019च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी वायनाडमधून विजयी झाले होते. पुन्हा एकदा येथील जनतेने त्यांना कौल दिला आहे. सहा महिन्याच्या आत वायनाडची जागा राहुल गांधी यांना सोडावी लागेल, त्यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी येथून पोटनिवडणुक लढवणार असल्याचे बोलले आहे. ज्या मतदारसंघांमधून जास्त मताधिक्य असेल तो मतदारसंघ कायम ठेवण्याची गांधी घराण्याची परंपरा आहे. राहुल गांधी काय निर्णय घेणार, हे लवकरच समजेल.

भारतीय संविधानानुसार, कोणत्याही उमेदवाराला एकापेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवता येऊ शकते. पण त्याला निवडून आल्यानंतर त्या उमेदवाराला फक्त एकाच जागेचं प्रतिनिधित्व करता येऊ शकतं. घटनेच्या कलम १०१ (१) आणि लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम ६८ (१) मध्ये हे स्पष्टपणे नमूद केले आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT