Rahul Gandhi News Sarkarnama
देश

Rahul Gandhi News : राहुल गांधींना शेवटची आशा; गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव

Rahul Gandhi Supreme Court : काँग्रेस नेते राहुल गांधी मानहानीच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Rahul Gandhi Gujarat High Court : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी मानहानीच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहेत. गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. गुजरात उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिल्याच्या निर्णयाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

राहुल गांधी यांनी आपल्या याचिकेत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. गुजरात उच्च न्यायालयाने त्यांना मानहानीच्या प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला होता. राहुल गांधी यांच्यावर 10 गुन्हेगारी खटले प्रलंबित असल्याचे गुजरात उच्च न्यायालयाने म्हटले होते. याशिवाय कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयात काहीही चुकीचे नाही, असे स्पष्ट करत याचिका फेटाळळी होती.

आता या विरोधात राहुल गांधी (Rahul Gandh) सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांना दिलासा मिळणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राहुल गांधी यांची याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाने म्हटले होते की, लोकप्रतिनिधी हा स्वच्छ चारित्र्याचा असावा.

स्थानिक न्यायालयाने दिलेल्या दोन वर्षाच्या शिक्षेला स्थगिती देण्याची राहुल गांधींची याचिका 20 एप्रिल रोजी सुरत न्यायालयाने फेटाळली होती. याविरोधात राहुल गांधी यांनी गुजरात (Gujarat) उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयानेही दिलासा दिला नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांना संसदेचे सदस्यत्व गमवावे लागले. भाजपचे (BJP) माजी आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती.

दरम्यान, पूर्णेश मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने आपली बाजू ऐकल्याशिवाय कोणताही आदेश देऊ नये, अशी विनंती त्यांनी केली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय राहुल गांधी यांच्या याचिकेवर काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT