New Dehli News : देशभरातील विरोधी पक्षाने एकत्रित येत गेल्या दहा दिवसापासून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी रान पेटवले आहे. सोमवारी काँग्रेससह विरोधी इंडिया आघाडीतील सर्वच पक्षाच्या खासदार व आमदारानी सुप्रीम कोर्टवर मोर्चा काढला होता. या मोर्चामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. या मोर्चांनंतर दाखल करण्यात आलेल्या याचिकामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यावर येत्या 27 ऑक्टोबरला सुनावणी घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या इंडिया आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन दिवसापूर्वी राष्ट्र्पती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती. त्यानंतर या नेत्यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांची भेट घेण्याची वेळ मागितली होती. मात्र, अधिकार श्रेणी आणि घटनात्मक मर्यादांचा हवाला देत सरन्यायाधीशांनी नेत्यांना भेटण्यास नकार दिला होता. 'थेट भेटण्याऐवजी कोर्टात याचिका दाखल करण्याचा सल्ला त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिला होता. त्यानुसार राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) लीगल टीमने सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये अधिकृतपणे याचिका दाखल केली आहे. त्याला डायरी नंबरही प्राप्त झाला आहे.
सुप्रीम कोर्टाने या प्रकरणातील सर्व याचिका स्वीकारताना मुख्य निवडणूक आयुक्तांसह इतर दोन निवडणूक आयुक्तांनाही प्रतिवादी केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांना या प्रकरणात प्रतिवादी बनवण्यात आले आहे. या सर्व याचिकांवर आता येत्या 27 ऑक्टोबरला सुनावणी घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. विरोधी पक्षांचे प्रमुख नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, खासदार संजय राऊत, सुप्रिया सुळे (Supriya sule), एम. ए. बेबी, डी. राजा, महुआ माझी, सौगत रॉय आणि ई. टी. मोहम्मद बशीर या 11 प्रमुख नेत्यांचा याचिकाकर्त्यांमध्ये समावेश आहे.
सोमवारी सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढत इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी मोर्चा काढला. यानिमित्ताने विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत मोर्चा काढून याचिका दाखल केल्या आहेत. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने मोर्चा काढत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.