Rahul_Gandhi_and_Narendra_Modi 
देश

राहुल गांधी यांचा  नरेंद्र मोदींवर घणाघात; मोदी कसे प्रत्युत्तर देणार याबाबत उत्सुकता 

सकाळ वृत्तसेवा / वृत्तसंस्था

जंबुसार (गुजरात) : केंद्र सरकारच्या नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीमुळे व्यापाऱ्यांना सुलभपणे उद्योग करणे कठीण होऊन बसले असून, नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली असल्याचा घणाघाती आरोप कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. भरूचमधून आज पुन्हा प्रचाराला सुरवात करताना राहुल यांनी सत्ताधारी पक्षाला लक्ष्य केले. 

राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये भरूच येथून प्रचाराच्या पुढच्या टप्प्याला सुरवात केली आहे .  त्यांनी नोटबंदी , जीएसटी या मुद्द्यांवर  व्यापारी ,शेतकरी आणि नागरिकांना कसा त्रास सहन करावा लागत आहे हा आपल्या प्रचाराचा मुख्य भाग बनवला आहे . 

"आमचे अर्थमंत्री कार्यालयामध्ये बसतात आणि परकी संस्था काय म्हणतात याकडेच त्यांचे लक्ष असते. जेटली यांनी वास्तव जाणून घेण्यासाठी लघू आणि मध्यम व्यापाऱ्यांची केवळ पाच ते दहा मिनिटे भेट घ्यावी

आणि त्यांना खरोखरच केंद्राच्या निर्णयामुळे तुम्हाला व्यवसाय करणे सोपे झाले आहे का, असे विचारावे. अशावेळी सगळा देश एक सुरामध्ये "जीएसटी' आणि नोटाबंदीमुळे आमचे नुकसानच झाले, असा सूर आळवेल,'' असे म्हणत भरूच येथे राहुल गांधी यांनी जेटलींना टीकेचे लक्ष्य केले .  


आदिवासी भाग पिंजून काढणार 
आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यामध्ये राहुल गांधी हे गुजरातमधील आदिवासी भाग पिंजून काढणार आहेत. राहुल यांच्या  ' नवसर्जन यात्रे'ला आज भरूचमधून प्रारंभ झाला. ही यात्रा जवळपास 34 मतदारसंघांमधून जाईल.

यातील बहुतांश मतदारसंघ हे कधीकाळी कॉंग्रेसचे बालेकिल्ले होते. भरूच, तापी आणि सुरत या तीन जिल्ह्यांना नजरेसमोर ठेवून ही यात्रा सुरू करण्यात आली होती.

याखेपेस आम्ही पूर्वीच्या बारा जागांवर नक्की विजय मिळवू असा आशावाद कॉंग्रेस नेते डॉ. तुषार चौधरी यांनी व्यक्त केले आहे. राहुल गांधी आपल्या या दौऱ्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि शेतकऱ्यांशी देखील संवाद साधणार आहेत. 

मोदीही गुजरातमध्ये 
अक्षरधाम मंदिराच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त  गुरुवारी  आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. स्वामी नारायण पंथाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातही ते भाषण करतील.

राज्य सरकारच्यावतीने "प्रकाश महोत्सव' आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाचेही मोदींच्या हस्ते उद्‌घाटन केले जाणार आहे. पंतप्रधान मोदी हे भाजपचे स्टार कॅंपेनर असून, त्यांच्या विक्रमी सभांचे प्रदेश भाजपने आयोजन केले आहे. पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून भाजपची प्रचार यात्रा जोर पकडण्याची शक्‍यता आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT