Rahul Gandhi Latest News Sarkarnama
देश

Rahul Gandhi Opposition Meeting : देशासाठी बलिदान करण्यास काँग्रेस तयार; राहुल गांधींचा निर्धार

सरकारनामा ब्यूरो

Rahul Gandhi Speaks at Bihar Meeting: भारताच्या लोकशाहीवर भाजप आक्रमण करत आहे. भारताच्या पायावर आक्रमण होत आहे. देशातील संस्थांवर हल्ले होत आहेत. आवाज दाबला जात आहे. भाजप आणि 'आरएसएस' हे हल्ले करत आहेत. पण ही विचारधारेची लढाई आहे आणि आम्ही या लढाईत सर्वजण सोबत उभे आहोत. आमच्यात थोडा-थोडा फरत नक्कीच असेल, पण आम्ही एकत्रितरित्या मिळून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारमध्य आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

केंद्रातील भाजप सरकाच्या विरोधात देशभरातील विरोधी पक्षनेत्यांची आज बिहारमध्ये महाबैठक पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. या बैठकीला महाराष्ट्रासह देशभरातील नेतेमंडळींनी उपस्थिती होते. महाराष्ट्रातून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत हेदेखील उपस्थित आहेत. (Bihar Meeting)

याचवेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamatha Banerjee) यांनीही भाजपवर सडकून टिका केली आहे. याचवेळी त्यांनी देशातील परिस्थितीकडेही लक्ष वेधलं आहे. ''दिल्लीतून अनेकदा बैठका झाल्या पण त्यावर काही तोडगा निघाला नाही, मग मी नितीशजींना पटनातून सुरुवात करण्याचा आग्रह धरला. त्यांनी विरोधीपक्षनेत्यांची बैठक बोलवली आणि तीन विषयांवर काम करण्यावर आमचे एकमत झाले आहे.

"यातील पहिले- आम्ही सर्वजण एक आहोत. दुसरी- आम्ही सर्वजण एकत्रितरित्या लढणार आणि तिसरी- भाजपच्या (BJP) हुकूमशाहीच्या विरोधात लढाई लढणार. आम्हाला विरोधी पक्ष बोलू नका आम्हीही यादेशाचे नागरिक आहोत. आम्हीही देशप्रेमी आहोत. आम्हीही 'भारत माता की जय' बोलतो. आम्ही निर्धार केला आहे की, भाजपच्या या हुकूमशाही सरकारला पराभूत करायचं आहे." असही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

''आज भाजपच्या विरोधात कोणी बोलत असले तर त्यांच्यामागे ईडी,सीबीआय लावतात. इतकचं नाही तर वकिलांच्या माध्यमातून कोणत्याही खोट्या केसेस टाकल्या जात आहेत. बेरोजगारी, सामान्य जनता, महिला अत्याचार, दलितांवर आत्याचाराची चिंचा करत नाहीत. भाजप हुकूमशाही लादण्यासाठी जे काळे कायदे लागू करेल त्या सर्व कायद्यांच्या विरोधात आमची लढाई असेल. आमचं रक्त वाहायचं असेल तर वाहुद्या पण आम्हाला जनतेची रक्षा करुद्या, नाहीतर देश राहणार नाही,'' असी भितीही ममता बॅनर्जी यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT