Rahul Gandhi secret love story Sarkarnama
देश

Rahul Gandhi secret love story : मी गर्लफ्रेंडला नेमकं त्याच रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेलो, जिथे..." राहुल गांधींनी पहिल्यांदाच उघड केली 'सिक्रेट लव्ह स्टोरी'

Rahul Gandhi girlfriend restaurant story : राहुल गांधींनी पहिल्यांदाच आपल्या सिक्रेट लव्ह स्टोरीबाबत खुलासा केला आहे. गर्लफ्रेंडला नेमक्या त्याच रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेल्याचा किस्सा काय? जाणून घ्या सविस्तर.

Rashmi Mane

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच आपल्या गर्लफ्रेंडचा उल्लेख करत खासगी आयुष्यातील एक खास आठवण सांगितली आहे. आई सोनिया गांधी यांच्या 'Belonging: A Journey of Love' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील हा किस्सा उलगडला. केंब्रिजमध्ये शिक्षण घेत असतानाची ही आठवण असून, राहुल गांधी यांनी आपल्या आई-वडिलांच्या प्रेमकहाणीशी जोडलेला एक खास प्रसंग यावेळी सांगितला.

राहुल गांधी यांनी सांगितले की, त्यांना लहानपणापासूनच वडील राजीव गांधी आणि आई सोनिया गांधी यांच्या पहिल्या भेटीची गोष्ट ऐकायला मिळाली होती. त्यामुळे केंब्रिजमध्ये शिक्षणासाठी गेले असताना त्यांनी आपल्या गर्लफ्रेंडला त्याच रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेतला, जिथे त्यांच्या आई-वडिलांची पहिली भेट झाली होती.

या प्रसंगाची आठवण सांगताना राहुल गांधी म्हणाले की, त्या रेस्टॉरंटच्या दरवाजाचा रंग पिवळा होता. दोघेही तिथे पोहोचल्यानंतर कर्मचाऱ्यांनी किती जण आहात, अशी विचारणा केली. त्यावर राहुल यांनी 'दो' असे उत्तर दिले. त्यानंतर दोघांनी मेन्यू पाहून जेवणाची ऑर्डर दिली. विशेष म्हणजे, तिथल्या वेटरने राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या जुन्या भेटींच्या आठवणीही त्यांना सांगितल्या. राहुल यांनी आपल्या आई-वडिलांना आवडणारा चिकनचा पदार्थही त्याच रेस्टॉरंटमध्ये मागवला होता.

दरम्यान, सोनिया गांधी यांच्या पुस्तकात राजीव गांधी यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीचा सविस्तर उल्लेख आहे. 1965 मध्ये इंग्लंडमधील केंब्रिज येथील 'Varsity Restaurant' या ग्रीक रेस्टॉरंटमध्ये दोघांची पहिली भेट झाली होती. एका समान मित्राने त्यांची ओळख करून दिली होती. पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि 25 फेब्रुवारी 1968 रोजी दोघे विवाहबंधनात अडकले.

राहुल गांधी यांनी सांगितलेल्या या आठवणींमुळे गांधी कुटुंबाच्या खासगी आयुष्यातील एक वेगळी बाजू समोर आली असून, त्यांच्या गर्लफ्रेंडविषयीच्या उल्लेखाचीही सध्या चर्चा होत आहे.

SCROLL FOR NEXT