Bjp leaders criticise Rahul Gandhi Latest News
Bjp leaders criticise Rahul Gandhi Latest News Sarkarnama
देश

राहुल गांधींनी आपली भारत जोडो यात्रा पाकिस्तानात काढावी; भाजपचा टोला

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहूल गांधी (Rahul Gandhi) यांनी आजपासून सुरू केलेल्या ‘भारत जोडो‘ यात्रेवरील भाजपचे हल्ले सुरू झाले आहेत. ‘कॉंग्रेसने (Congress) केलेल्या फाळणीनंतर भारत आजतागायत एसकंध आहे. त्यामुळे भारत जोडायचा असेल तर गांधी यांनी आपली यात्रा पाकिस्तानात जाऊन काढावी,असा प्रतिटोला भाजपने (BJP) लगावला आहे. त्यावर , भाजप नेते लालकृष्ण अडवानी यांची यापूर्वीची रथयात्रा ही ‘रक्तयात्रा‘ व ‘दंगलयात्रा‘ ठरली. मात्र देशाची खंडता कॉंग्रेसच्या ‘डीएनए‘ मध्येच असल्याने राहूल गांधी यांच्या यात्रेचे नाव भारत जोडो आहे,असे प्रत्युत्तर कॉंग्रेसच्या वतीने देण्यात आले. (Bjp leaders criticizes Rahul Gandhi Latest News)

अर्थात अजून यात्रेला सुरवात व त्याला मिळणारा प्रतिसाद अद्याप स्पष्ट नसल्याने भाजपची ‘पहिली फळी‘ अजून शांत आहे. आगामी एकदोन दिवसांत भाजपचे अग्रणी नेते राहूल गांधी यांच्या यात्रेवर आडून प्रहार करतील व त्यांचा पहिला हल्ला इंडिया गेट-सेंट्रल व्हिस्टा एव्हेन्यूवर उद्या (ता.८ ऑगस्ट) सायंकाळी सुरू होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर टीका करताना भाजप नेते सिध्दार्थनाथ सिंह यांनी, राहूल गांधी यांना कोणता भारत जोडायचा आहे?, असा सवाल केला. जो खंडित झाला व ज्यासाठी राहूल यांचाच पक्ष जबाबदार होता त्या पाकिस्तानात जाऊन भारत जोडण्यासाठी राहूल गांधी यांनी यात्रा काढावी, येथे राहून असे काही प्रकार करू नये,असाही प्रहार त्यांनी केला.

काँग्रेसचे माजी नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा ‘भारत जोडो यात्रे'वर जोरदार हल्लाबोल करताना, त्यांनी ही यात्रा पाकिस्तानात करावी. कारण, भारत एका फाळणीनंतर आजतागायत ७५ वर्षांत कधीही तुटलेला नाही, असं त्यांनी म्हटलंय. १९४७ मध्ये काँग्रेसची सत्ता असताना भारताची फाळणी झाली होती. आता राहुल गांधींनी ही यात्रा पाकिस्तानात नेली पाहिजे. कारण भारत सध्या एकसंध आहे व आता अखंड भारताची वेळ आली आहे, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, राहूल गांधी आज कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रेला प्रारंभ करतील. ते रोज किमान २० किलोमीटर अंतर पायी जातील. या पाच महिन्यांत १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असणार आहे. या यात्रेचे एकूण अंतर सुमारे ३५०० किलोमीटर असेल. कन्याकुमारी, तिरुवनंतपुरम, कोची, निलांबूर, म्हैसूर, बेल्लारी, रायचूर, विकाराबाद, अकोला, नांदेड, जळगाव जामोद, इंदूर, कोटा, दौसा, अलवर, बुलंदशहर, दिल्ली, अंबाला, पठाणकोटमार्गे जम्मू आणि श्रीनगरमध्ये यात्रेची सांगता होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून राहुल गांधींना लक्ष केलं जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT