Sanjay Raut, Rahul Gandhi, Narendra Modi sarkarnama
देश

राहुल गांधींच्या भाषणानं सत्ताधाऱ्यांच्या डोक्याला शॉट ; राऊतांनी डिवचलं

२०१४ सालीच देश निर्माण झाला असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी राहुल गांधींनी डोक्याला शॉट दिला आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई :कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेले भाषण सध्या चर्चेचा विषय आहे. त्यांच्या भाषणावर भाजपच्या नेत्यांनी कडाडून हल्ला केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भाषणावरुन भाजप नेत्यांना खडे बोल सुनावले आहे.

''चिनी सैन्य लडाखमध्ये का घुसले असे विचारणाऱ्यांना चीनचे एजंट ठरवणे म्हणजे राज्य करणे नव्हे. राहुल गांधी यांनी याच प्रवृत्तीवर जोरदार प्रहार केला आहे. त्यांचे टोकदार भाषण सत्ताधाऱ्यांना झोंबणारच,'' असा चिमटा राऊतांनी भाजप नेत्यांना घेतला आहे.

''२०१४ सालीच देश निर्माण झाला असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी राहुल गांधींनी डोक्याला शॉट दिला आहे. माझे पणजोबा पंडित नेहरू हे देशासाठी पंधरा वर्षे तुरुंगात होते. माझ्या आजीने, इंदिरा गांधींनी देशासाठी शरीरावर ३५ गोळ्या झेलल्या. माझे वडील राजीव गांधी हेसुद्धा देशासाठीच हुतात्मा झाले. तुम्ही मला काय देश शिकवता? मला माझा देश चांगला माहीत आहे, असा तीर राहुल गांधींनी सोडला व त्यामुळे सत्ताधारी घायाळ झाले.’ असा टोला 'सामना'च्या अग्रलेखात लगावला आहे.

‘राहुल गांधी यांनी हे सर्व संसदेच्या व्यासपीठावर सांगितले व त्याबद्दल भाजपचे प्रवक्ते त्यांना चीनचे एजंट ठरवू लागले. या मूर्खपणास काय म्हणायचे! मोदी सरकारकडे विस्मरणाची कला आहे, पण सत्य ऐकून घेण्याचे इंद्रिय त्यांच्यापाशी नाही. २०१४ च्या प्रचारात दिलेली वचने सरकारच्या स्मरणात नाहीत. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख, महागाई खतम करणार, इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही. पाकव्याप्त कश्मीर पुन्हा परत आणणार, दोन कोटी बेरोजगारांना प्रत्येक वर्षी नोकऱ्या या वचनांची आठवण करून देणारे राष्ट्रद्रोही ठरवले जातात,'' असे अग्रलेखात म्हटलं आहे.

''पाकिस्तान व चीन हे हिंदुस्थानविरोधात एकत्र आले आहेत हा देशाला मोठा धोका आहे. दोन दुश्मनांना एकत्र येण्याची संधी मोदी सरकारने दिली, असा दावा गांधी करतात तेव्हा त्यास आधार आहे. लडाखमध्ये चीन घुसले आहे, ते माघार घ्यायला तयार नाही. पाकिस्तानचे छुपे हल्ले संपले नाहीत व आता चीनने पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला, हे आपल्यासाठी धोकादायक आहे,'' असे राऊतांनी भाजपला सुनावलं.

  • देशासाठी बलिदान, रक्त सांडणे, त्याग वगैरे गोष्टींशी सध्याच्या दिल्लीतील राज्यकर्त्यांचा संबंध राहिलेला नाही.

  • दोन-पाच उद्योगपतींभोवतीच देशाचे चक्र फिरते आहे. सरकार म्हणजे काय? याचा विसर पडला आहे.

  • सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स हेच जणू मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत.

  • पुलवामा घडले ही सध्याच्या सत्ताधाऱ्यांना संरक्षण व्यवस्थेची मोठी चूक वाटत नाही.

  • चिनी सैन्य लडाखमध्ये का घुसले असे विचारणाऱ्यांना चीनचे एजंट ठरवणे म्हणजे राज्य करणे नव्हे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT