Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi Defamation Case: सुरतला जाणाऱ्या Congress नेत्यांच्या गाड्या अडवल्या ; काँग्रेस आक्रमक

सरकारनामा ब्युरो

Rahul Gandhi News: 'मोदी'आडनावावरुन वादग्रस्त विधान करणारे काँग्रेसचे (Congress) माजी खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) सुरत येथे पोहोचले आहेत. आज (सोमवारी) ते सुरत सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.

त्यांच्यासोबत त्यांची बहीण प्रियंका गांधी वड्रा आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत, भूपेश बघेल आणि सुखविंदर सिंग सुखू , तीन राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत. यात नाना पटोलेंचा यात समावेश आहे.

काँग्रेसचे अनके नेते, पदाधिकारी हे सुरत सत्र न्यायालयाच्या दिशेकडे रवाना झाले आहेत. सुरत न्यायालयात उपस्थित राहण्यास जात असलेल्या काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांची गाडी सुरत पोलिसांनी अडवली आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत.

'काय करायचे ते करा आम्ही घाबरत नाही," अशी संतप्त भावना यशोमती ठाकुर यांनी व्यक्त केली आहे. 'सुरतला जाणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांच्या गाड्या तुम्ही अडवल्या होत्या का ?, असा सवाल ठाकुर यांनी पोलिसांनी विचारला आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी नुकतीच रद्द करण्यात आली आहे. त्यांच्या निषेधार्थ काँग्रेसकडून देशभर आंदोलन,मोर्चा काढण्यात येत आहे. काँग्रेसकडून 'लोकशाही वाचवा'अभियान सुरु आहे. या अभियानात ही घटना झाली आहे.

'मोदी'आडनावावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे सुरत सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे २०२४ ची निवडणुक ते लढवू शकणार नाही. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी ते आज न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याने काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. लोकसभा सचिवालयाने ही कारवाई केली आहे. राहुल गांधी यांच्यापूर्वीही काही लोकप्रतिनिधींवर अशा प्रकारची कारवाई केली आहे.

मानहानीच्या या प्रकरणात दोषी ठरवणारा दंडाधिकारी आदेश रद्द करण्यासाठी राहुल गांधी सुरतच्या न्यायालयात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेस सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी मिळालेल्या शिक्षेवर अंतरिम स्थगिती देखील मागू शकतात. ज्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल होण्याचा मार्ग मोकळा होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT