rahul gandhi takes stand on kamal naths controversial remark
rahul gandhi takes stand on kamal naths controversial remark  
देश

कमलनाथ माझ्या पक्षाचे असले तरी अशा गोष्टींचे समर्थन नाहीच; राहुल गांधींची जाहीर भूमिका

वृत्तसंस्था

भोपाळ : मध्य प्रदेशात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. काँग्रेसने मध्य प्रदेशात सत्तांतर करण्याचा चंग बांधला असून, जोरदार प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, माजी मंत्री व भाजपच्या महिला उमेदवाराबद्दल बोलताना काँग्रेस नेते कमलनाथ यांनी वादग्रस्त वक्तव्यावरुन गदारोळ उडाला आहे. आता या मुद्द्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अखेर जाहीर भूमिका मांडली आहे. 

मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण आता पुन्हा तापू लागले आहे. राज्यात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहे. या निवडणुका 9 नोव्हेंबरला  होत आहेत. काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कंबर कसली आहे. राज्यातील भाजप नेत्यांना फोडून ते मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.  

जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 22 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. आता राज्यात एकूण 28 मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. यातील तब्बल 16 ग्वाल्हेर भागातील आहेत. शिंदे यांच्या ग्वाल्हेर या बालेकिल्ल्यात कमलनाथ यांनी काही दिवसांपूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले होते. 

कमलनाथ यांनी जाहीर सभेत बोलताना माजी मंत्री व भाजपच्या उमेदवार इमरती देवी यांच्याबद्दल आक्षेपार्ह शेरेबाजी केली होती. इमरती देवी उभ्या असलेल्या डाबरा मतदारसंघातील  सभेत बोलताना कमनाथ यांनी हे वक्तव्य केले होते. आमचा येथील उमेदवार तिच्यासारखा नाही...काय बरे तिचे नाव? असा सवाल कमलनाथ यांनी सभेला उपस्थित नागरिकांना केला होतो. त्यावेळी नागरिकांना इमरती देवी यांचे नाव घेण्यास सुरूवात केली. यावर कमलनाथ म्हणाले होते की, माझ्यापेक्षा तुम्ही तिला चांगले ओळखता. तुम्ही लोकांनी आधीच मला सावधगिरीचा इशारा द्यायला हवा होता. ये क्या आयटम है. 

कमलनाथ यांनी केलेल्या  वादग्रस्त  विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. महिलेबद्दल असे विधान केल्याबद्दल कमलनाथ यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या मुद्द्यावर भाजपही आक्रमक झाला असून, कमलनाथ यांच्याविरोध भाजपने मोहीम उघडली आहे. यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अखेर जाहीर भूमिका घ्यावी लागली आहे. 

राहुल गांधी म्हणाले की, कमलनाथ यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या अशाप्रकारच्या विधानाचे मी अजिबात समर्थन करीत नाही. कमलनाथ हे माझ्या पक्षात असले तरी व्यक्तिश: मला त्यांचे विधान आवडलेले नाही. कोणीही असले तरी अशा प्रकारचे विधान अयोग्यच आहे.  

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT