Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi in Lok Sabha : राहुल गांधींचा UPA सरकारला घरचा आहेर; लोकसभेत कळीचा मुद्दा मांडला...

Parliament Session Live Lok Sabha News UPA Government : राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषणादरम्यान बेरोजगारीच्या समस्येवर भाष्य केले.

Rajanand More

New Delhi News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधताना यूपीए सरकारलाही घरचा आहेर दिला. 2004 ते 2014 च्या काळात देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएची सत्ता होती. बेरोजगारीच्या मुद्द्यावर राहुल यांनी आपल्याच सरकारच्या अपयशावर अप्रत्यक्षपणे भाष्य केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नार सरकार गंभीर नसल्याचा उल्लेख राहुल गांधींनी भाषणादरम्यान केली. या मुद्द्यावर यूपीए सरकार असो की पीएम मोदींचे सरकार दोघांनीही याचे ठोस उत्तर दिलेले नाही. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात नवीन काहीच नाही. बेरोजगारीबाबतही काही नसल्याकडे राहुल यांनी लक्ष वेधले.

राहुल यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून पहिल्यांदाच यूपीए सरकारकडेही बोट दाखवले. त्यामुळे भाजपच्या हाती आयते कोलित मिळाले आहे. आता भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून त्याला कसे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

भाषणादरम्यान राहुल यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीवर भाष्य केले. त्यावर मोठा वाद झाला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला बोलावण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना अमेरिकेला पाठविण्यात आल्याचा दावा राहुल यांनी केला. त्यावरून संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी यामध्ये कसलेही तथ्य नसल्याचे तातडीने स्पष्ट केले. त्यावर राहुल यांनी तुमचे मनस्वास्थ विचलित केल्याबद्दल माफी मागतो, असा टोला लगावला.

मेक इन इंडिया चांगली कल्पना

राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ योजनेचा आपल्या भाषणादरम्यान उल्लेख केला.ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मेक इन इंडिया’ ची संकल्पना चांगली होती. त्याचे आपण पुतळे पाहिले, कार्यक्रम पाहिले, कथित गुंतवणूक पाहिली. पण त्यातून काय मिळाले, हे आता माझ्यासमोर आहे. उत्पादनाच्या बाबतीत ही योजना फेल ठरल्याची टीका राहुल यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT