Rahul Gandhi
Rahul Gandhi  Sarkarnama
देश

Nitish Kumar : राहुल गांधींची पंतप्रधानपदाची उमेदवारी; कमलनाथांच्या विधानाला नितीशकुमारांचा दुजोरा

सरकारनामा ब्यूरो

Nitish Kumar : काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी हे २०२४ ला पंतप्रधान पदाचा चेहरा असतील, असं मोठं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी शनिवारी केलं. या पार्श्वभूमीवर बोलताना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारीवर आमचा विरोध नाही, असं भाष्य आज केलं. त्यामुळे २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधींच असतील का? अशी चर्चा अता सुरू झाली आहे.

नितीशकुमार म्हणाले, ''राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून आम्हाला कोणतीही अडचण नाही. मात्र यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एक निर्णय घेण्याची गरज आहे. याबाबत आम्हाला कोणताही आक्षेप नाही. पण यावर एक बैठक घेऊन सविस्तर चर्चा झाली पाहिजे'', असं मत त्यांनी व्यक्त केलं.

''तसेच आम्ही सर्व एकत्र चर्चा करू. त्यानंतर पुढे निर्णय घेऊ. एक बैठक घेऊन त्यामधील चर्चेनंतर पुढील रणनीती ठरवू. सध्या तर सर्वांचा आपापला कार्यक्रम सुरू आहे. पण राहुल गांधी जर २०२४ ला पंतप्रधानपदाचे उमेदवार होऊ इच्छित असतील तर आमचा त्यावर कोणताही आक्षेप असणार नाही'', असं नितीशकुमार म्हणाले.

पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याबाबत कमलनाथही म्हणाले...

२०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचा चेहरा असतील, असं मोठं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी शनिवारी केलं. तसेच त्यांनी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेमध्ये केलेल्या नेतृत्वाचेही कौतुक केले. कमलनाथ हे एका मुलाखती दरम्यान बोलत होते. त्यांच्या या विधानाची देखील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

कमलनाथ म्हणाले होते की, ''राहुल गांधी सत्तेचे राजकारण करत नाहीत तर ते जनतेचे राजकारण करतात. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी जे नेतृत्व केलं त्यांच्या या नेतृत्वाचं सर्वांनी कौतुक केलं. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी फक्त विरोधकांचा चेहरा नसून ते पंतप्रधानपदाचा चेहरा असतील, असं कमलनाथ यांनी सांगितलं.

दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी (Rahul Gandhi) हे विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचा चेहरा असण्याबबात काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि आता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी देखील तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे सध्या चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT