BJP and Congress Sarkarnama
देश

Rajasthan Election : भाजप, काँग्रेसने आयारामांना संधी दिल्याने प्रस्थापितांमध्ये नाराजी; अनेक ठिकाणी नातेवाईकच आमने-सामने!

BJP and Congress Politics : उमेदवारी न मिळाल्याने दोन्ही पक्षांतील इच्छुकांकडून बंडखोरी

Mayur Ratnaparkhe, Sachin Waghmare

Rajasthan Legislative Assembly Election News :आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे ऐन हिवाळ्यातच राजस्थानमधील वातावरण चांगलेच तापले आहे. विशेषतः राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात काँग्रेस व भाजपने यादी जाहीर केली.

यामध्ये दोन्ही पक्षांनी आयारामांना संधी दिली आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमधील स्वपक्षीय इच्छुक, विद्यमान नेतेमंडळीत नाराजी आहे. त्यातच अनेक मतदारसंघांतून भाजप व काँग्रेसने नातेवाइकांना रिंगणात उतरविल्याने अनेक ठिकाणी नातलग आमने-सामने आल्याने या रंगतदार निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजस्थानात भाजप, काँग्रेसने एकमेकांविरोधात नातेवाइकांना निवडणूक रिंगणात उतरवत चुरस निर्माण केली आहे. काही ठिकाणी नातेवाईक आमने-सामने आल्याने या लढती रंगतदार होण्याची शक्यता आहे. राजस्थानातील धोलपूर मतदारसंघात भावजी आणि मेहुणी एकमेकांच्या विरोधात उभे टाकले आहेत. भाजपने शिवचरण कुशवाह यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने शोभा राणी कुशवाहा यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे भावजी आणि मेहुणी यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

२०१८च्या निवडणुकीत शोभा राणी कुशवाहा या १९ हजार मताने विजयी झाल्या होत्या. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार शिवचरण कुशवाह यांचा पराभव केला होता. दरम्यान, २०२३ च्या निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी पक्ष बदलले आहेत.

नागोर जिल्ह्यातील जायल मतदारसंघात दोन जावा एकमेकांविरुद्ध निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. काँग्रेसने मंजू देवी यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपने त्यांच्या विरोधात जाऊबाई डॉ. मंजू बागमार यांना तिकीट दिले आहे. दोन जावांमध्ये होणाऱ्या या लक्षवेधी लढतीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. २०१८च्या निवडणुकीत जायल विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या मंजू देवी यांनी राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे अनिल को यांचा १८ हजार मताने पराभव केला होता.

राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेसने आयारामांना मोठ्या प्रमाणात संधी दिली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षात बंडखोरी झाल्याचे पाहावयास मिळते. काँग्रेसच्या १२ जणांनी बंड पुकारले आहे, तर भाजपच्या आठ जागांवर बंडखोरी झाली आहे. त्यामुळे या जागावरती दोन्ही पक्षांना फटका बसणार आहे.

(Edited by Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT