BJP Sarkarnama
देश

Elections Result : CJP मुळे शिक्षणमंत्र्यांची विकेट जाणार? मतदारसंघातच दारूण पराभव, दोन माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांनाही झटका

Rajasthan civic election results, Madan Dilawar, Madan Dilawar constituency : बारां नगरपरिषदेत भाजपचा दारूण पराभव; आपची बहुमताकडे कूच, शिक्षणमंत्री मदन दिलावर यांचा गड डळमळीत.

Rajanand More

Rajasthan municipal election : कॉक्रोच जनता पार्टीच्या 'शाळा नीट करा' या मोहिमेअंतर्गत देशभरातील कार्यकर्त्यांनी अनेक शाळांना भेटी देत तेथील दुरावस्था जगासमोर आणली होती. यादरम्यान राजस्थानमध्ये आशुतोष रांका आणि तेथील शिक्षणमंत्री मदन दिलावर यांच्यामध्ये चांगलीच जुंपली होती. त्यानंतर काही दिवसांतच स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी झालेल्या मतदानात दिलावर यांना मोठा झटका बसला आहे.

भाजपची सत्ता असलेल्या राजस्थानमधील दहा महापालिकांसह नगरपरिषद व नगरपालिकांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच मतदान झाले होते. आतापर्यंत हाती आलेल्या निकालामध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली असली तरी काही मातब्बर नेत्यांना धक्काही बसला आहे. त्यामध्ये दिलावर यांच्या मतदारसंघातील बारां नगरपरिषदेत भाजपचा दारूण पराभव झाला आहे.

आतापर्यंत जाहीर झालेल्या २५ वॉर्डच्या निकालांमध्ये भाजपला केवळ तीन जागा मिळाल्या आहेत. या मतदारसंघात आम आदमी पक्षाने मुसंडी मारत १६ जागांवर विजय मिळविला आहे. तर काँग्रेसला सहा जागा मिळाल्या आहेत. या नगरपरिषदेत आपची सत्ता येणार, हे स्पष्ट झाले आहे.

राज्यात अन्य काही ठिकाणीही सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांना फटका बसला आहे. जोधपूर महापालिकेमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या वॉर्डमध्ये भाजपच्या उमेदवाराने मुसंडी मारली आहे. तर केंद्रीय. मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या भागात काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे.

माजी मुख्यमंत्री व भाजप नेत्या वसुंधरा राजे यांचे वर्चस्व असलेल्या झालावाडमधील नगर परिषदेत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. झालावाड जिल्ह्यातील आठपैकी चार नगर परिषदांमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. झालावाड नगर परिषदेत काँग्रेसने राजेंना धक्का दिला आहे. भाजपला केवळ तीन नगर परिषदा काबीज करता आल्या.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांचा गड मानल्या जाणाऱ्या पाली महापालिकेत भाजपला पराभव स्वीकारावा लागला आहे. या महापालिकेवर मागील दहा वर्षे भाजपची सत्ता होती. महापालिकेत ६५ पैकी २९ वॉर्डमध्ये काँग्रेसने विजय मिळविला असून भाजपला २१ जागांवर समाधान मानावे लागले. तर तब्बल १५ अपक्ष विजयी झाले आहेत. काँग्रेसला बहुमत मिळाले नसले तरी सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे आता अपक्ष गेमचेंजर ठरणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT