Congress party Latest Marathi News, Political News Updates in Marathi Sarkarnama
देश

अपमानास्पद पदावरून मुक्त करा! काँग्रेस मंत्र्याचीच मुख्यमंत्र्यांकडे मागणी

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजस्थान काँग्रेसमधील वाद उफाळून येण्यास सुरूवात झाली आहे.

सरकारनामा ब्युरो

जयपूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजस्थान काँग्रेसमधील वाद उफाळून येण्यास सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या सरकारमधील एका मंत्र्याला आपल्याला या पदावरून मुक्त करण्याची विनवणी केली आहे. त्यासाठी त्यांनी प्रधान सचिवांकडे बोट दाखवले आहे. त्यामुळे सरकारसह काँग्रेसमध्येही खळबळ उडाली आहे. (Congress Latest Marathi News)

राजस्थानचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री अशोक चाँदना यांनी ही मागणी केली आहे. त्यांनी गुरूवारी याबाबतचे ट्विट केले आहे. राज्याचे प्रधान सचिव कुलदीप रांका यांच्यावर ते नाराज असल्याचे यातून स्पष्ट झालं आहे. आपल्याला मंत्रिपदावरून मुक्त करत रांका यांच्याकडेच सर्व विभागांचा कारभार द्यावा, अशा संतापलेल्या स्वरात त्यांनी हे ट्विट केलं आहे. (Free me from cruel post, Rajasthan Minister Ashok Chandna to CM)

चाँदना यांनी म्हटलं आहे की, 'माननीय मुख्यमंत्रीजी, माझी आपल्याकडे वैयक्तिक मागणी आहे की, मला या अपमानास्पद मंत्रिपदावरून मुक्त करा. माझ्याकडील सर्व विभागांचा पदभार कुलदीप रांका यांच्याकडे द्यावा. कारण तसंही तेच सर्व विभागांचे मंत्री आहेत,' अशा शब्दांत चाँदना यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

मागील आठवड्यात काँग्रेसचे नेते गणेश गोघरा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. सत्ताधारी पक्षाचा आमदार आणि युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असूनही मान दिला जात नाही, अशी नाराजी त्यानी व्यक्त केली होती. स्थानिक प्रशासन आणि अधिकाऱ्यांकडून दाद दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला होता.

चाँदना यांच्या ट्विटनंतर भाजपने टोला लगावला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतिश पुनिया यांनी ट्विट करत आता जहाज बुडत आहे 2023 चे निकाल येण्यास सुरूवात झाली आहे, असं म्हटलं आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील नाराजी उफाळून येत असल्याने पक्षासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT