Mukul Wasnik
Mukul Wasnik Sarkarnama
देश

भाजपचा डाव काँग्रेसने उधळला; मुकूल वासनिक यांच्यासह ३ जागांवर मिळवला दणदणीत विजय

सरकारनामा ब्युरो

जयपूर : काँग्रेसला राजस्थानमधून मोठी गुडन्यूज मिळाली असून महाराष्ट्रातील मुकूल वासनिक यांच्यासह ४ पैकी ३ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. काँग्रेसचे उमेदवार रणदीप सुरजेवाला यांना ४३ मत मिळाली. तर मुकूल वासनिक यांना ४२ आणि प्रमोद तिवारी यांना ४१ मत मिळाली.

याशिवाय राजस्थानमध्ये भाजपला देखील १ जागा मिळाली असून भाजपचे माजी मंत्री घनश्याम तिवारी यांचा ४३ मतांसह विजय झाला आहे. भाजपने या निवडणूक आपल्या अतिरीक्त मतांचा वापर करत डॉ. सुभाष चंद्रा या माजी खासदारांना रिंगणात उतरवलं होतं. मात्र चंद्रा यांना ३० मत मिळाली असून त्यांना पराभवला सामोरं जावं लागलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT