Rajasthan Election Result 2023  Sarkarnama
देश

Rajasthan Assembly Results 2023 : भाजपने बहुमताचा आकडा गाठला; राज्यवर्धन सिंह राठोड पिछाडीवर, पायलट आघाडीवर

Rajasthan Assembly Election 2023 Result in Marathi : काँग्रेसचे नेते सचिन पायलट टोक मतदारसंघातून आपले नशीब अजमावत असून, ते आघाडीवर आहेत.

Mangesh Mahale

Rajasthan Assembly Elections Results 2023 : राजस्थान विधानसभा निवडणुकीचे कल समोर येत आहेत. टपाल मतांची मोजणी झाली आहे. ज्यात राज्यवर्धन राठोड पिछाडीवर आहेत. ते जयपूर ग्रामीणमधील झोतवाडा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

या जागेसाठी सगळ्याचे लक्ष लागले आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे अभिषेक चौधरी रिंगणात आहेत. बसपकडून अशोक कुमार शर्मा निवडणूक लढवत आहेत. राठोड यांनी केंद्र सरकारनं २००५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.

राठोड यांनी २०१३ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१४ मध्ये भाजपने त्यांना जयपूर ग्रामीणमधून तिकीट दिले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ उमेदवार डॉ. सी.पी. जोशी यांचा पराभव करून ते लोकसभेत पोहाेचले होते.

काँग्रेसचे नेते सचिन पायलट टोक मतदारसंघातून आपले नशीब अजमावत असून, काही वेळापूर्वी ते पिछाडीवर होते. मात्र, आता पुन्हा एकदा पायलट आघाडीवर असल्याचे चित्र आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, बुंदी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे हरिमोहन शर्मा आघाडीवर आहेत.

देशातील चार राज्यांचे निकाल थोड्याच वेळात लागणार आहेत. या चारही राज्यांत काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच असणार आहे. त्यातही काँग्रेस सत्तेवर येण्याची शक्यता अधिक बळावली आहे. या पार्श्वभूमीवर आमदारांची पळवापळवी होण्याची शक्यता अधिक आहे. आमदारांची फोडाफोडी रोखण्यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांनी रिसॉर्ट पॉलिटिक्स अवलंबलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT