ashok gehlot, ashok chandna
ashok gehlot, ashok chandna sarkarnama
देश

माझे मंत्रीपद काढूनच घ्या ; काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्र्यांना विनंती

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : काँग्रेसच्या एका मंत्र्याने आपल्याकडील मंत्रीपद काढून घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्याच्या या विनंतीमुळे राजकीय क्षेत्रात आर्श्चय व्यक्त करण्यात येत आहे. "हे अपमानास्पद मंत्री पद माझ्याकडून एकदाचे काढूनच घ्या," असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. आपल्याच खात्याच्या सचिवांवर हे मंत्री नाराज आहेत.

राजस्थानचे क्रीडामंत्री,काँग्रेसचे (Congress) नेते अशोक चांदना (ashok chandna) यांनी ही विनंती मुख्यमंत्री अशोक गहलोत (ashok gehlot) यांच्याकडे केली आहे. अशोक चांदना यांच्या नाराजीवरून भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. चांदनाच्या नाराजीचे पडसाद सोशल मीडियावर उमटत आहेत. अशोक चांदना यांच्या या मागणीमुळे काँग्रेस पक्षात देखील खळबळ उडाली आहे.

राज्याचे क्रीडा सचिव कुलदीप रांका आणि चांदना यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. त्यांच्यातील वाद अनेका चव्हाट्यावर आले आहेत. "कुलदीप रांका हेच सध्या सर्व विभागांचे मंत्री आहेत, मग माझ्याकडे मंत्रीपद कशाला ठेवता? हे अपमानास्पद मंत्री पद माझ्याकडून एकदाचे काढूनच घ्या," अशी विनंती अशोक चांदना यांनी केली आहे.

2009 मध्ये अशोक चांदना यांनी युवक काँग्रेसमध्ये कार्यकर्ता म्हणून प्रवेश केला. त्यानंतर राजस्थान प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. 2018 मध्ये अशोक गहलोत यांनी आपल्या मंत्रिमंडळात त्यांचा क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री म्हणून समावेश केला. अशोक चांदना (वय ३८) हे उत्तम जलतरणपटू आणि क्रिकेटपटू आहेत.

"चांदना यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर निशाणा साधण्यास सुरवात केली आहे. 2023 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये अशा बऱ्याच घडामोडी घडतील. कारण काँग्रेसचे जहाज बुडणार आहे," असे टि्वट भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सतीश पुनिया यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT